Most Harm Alcohol :  अनेकजण सेलिब्रेशनसाठी, काही प्रमाणात टेन्शन हलकं करण्यासाठी मद्य प्राशन (Drinking Alcohol) करतात. यामध्ये वाईन (Wine), व्हिस्की (Whiskey), रम (Rum), बिअरचे (Beer) सेवन केले जाते.  आपल्या आवडीनुसार अनेकजण आवडीचे मद्य घेतो. मात्र, फार कमी लोक हातात मद्याचा प्याला घेण्याआधी त्याच्या परिणामाबद्दल माहिती करून घेतात. तर, काहींजण वाईन, व्हिस्की, रम की बिअर यापैकी कोणते मद्य शरीरासाठी फायदेशीर आहे, अपायकारक आहे आणि हे मद्य कसे घेतले पाहिजे याबाबत चर्चा झोडतात. मात्र, मद्याने शरीराला अपाय होतो. मात्र, त्याचे प्रमाण कमी-अधिक असते.


वाईन पिणे किती हानिकारक आहे?


वाइन हा एक प्रकारचा फर्मेंटेड द्राक्षाचा रस आहे. वाईन ही लाल आणि काळ्या द्राक्षांपासून तयार केले जाते. एक किंवा दोन आठवडे ओक बॅरल्समध्ये ठेचलेली द्राक्षे आंबवली जातात तेव्हा रेड वाईन तयार केली जाते. पुढे, लाल वाइन ओक बॅरल्समध्ये काही कालावधीसाठी ठेवली जाते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण 14 टक्क्यांपर्यंत असू शकते.


व्हिस्की किती धोकादायक आहे?


व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. यामध्ये 30 टक्के ते 65 टक्के अल्कोहोल असते. व्हिस्की ही वेगवेगळ्या ब्रँडमध्ये विविध प्रमाणातील अल्कोहोलसह उपलब्ध आहे. हे तयार करण्यासाठी गहू आणि बार्ली आंबवले जातात. फर्मेंटेशननंतर ते काही काळ ओट कास्कमध्ये ठेवले जाते. 


बिअरला सर्वात कमी रिस्क?


बिअर तयार करण्यासाठी फळांचा आणि संपूर्ण धान्याचा रस वापरला जातो. त्यात अल्कोहोलचे प्रमाण खूपच कमी म्हणजे 4 ते 8 टक्के आहे. इतर मद्याच्या तुलनेत बिअरमध्ये मद्याचे प्रमाण कमी असते. 



रम घेणेही आहे धोकादायक 


थंड हवामानात, लोक सहसा रम पसंत करतात. हे एक डिस्टिल्ड हार्ड ड्रिंक आहे. फर्मेंटेड उसापासून बनवले जाते आणि त्यात 40 टक्के अल्कोहोल असू शकते. तथापि, अनेक ओव्हरप्रूफ रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण 60-70 टक्के इतके असू शकते. 


( Disclaimer : ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्य प्राशन करणे, त्याचे व्यसन असणे हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. मद्य सेवनाने यकृतांच्या आजारापासून इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या बातमीतून 'एबीपी माझा' कोणत्याही स्वरुपात मद्य सेवन करण्यास पाठिंबा दर्शवत नाही.)


इतर संबंधित महत्त्वाच्या बातम्या :