Health Tips : आजकाल तरुणांमध्ये मद्यपान (Alchohol) आणि सिगारेटचा (Cigarettes) ट्रेंड झाला आहे. याच्या आहारी गेलेली व्यक्ती या दोन गोष्टींशिवाय अपूर्ण मानला जातो. दारू आणि सिगारेट दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, सीओपीडी आणि कर्करोग यांसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्याच वेळी, मद्यपान केल्याने तोंड, घसा आणि स्तनाचा कर्करोग, पक्षाघात, मेंदूचे नुकसान आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच, दोन्हीचे एकत्रित सेवन आणखी धोकादायक आहे. जाणून घेऊयात मद्यपान आणि धुम्रपान यांचे एकत्आरित सेवन केल्याने आपल्या आरोग्याला किती नुकसान पोहोचवू शकते.
सिगारेट-अल्कोहोल कॉम्बिनेशन घातक आहे
1. गंभीर हृदयविकाराचा धोका
अल्कोहोलचे (Alchohol) सेवन आणि सिगारेटचा (Cigarettes) धूर श्वास घेतल्याने हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. धूम्रपानामुळे एथेरोस्क्लेरोसिसची समस्या उद्भवू शकते म्हणजेच रक्तवाहिन्या अरुंद होतात. तसेच, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने कार्डिओमायोपॅथी, उच्च रक्तदाब आणि अनियमित हृदयाचे ठोके यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आणखी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
2. यकृतावर घातक परिणाम होतो
अल्कोहोलचे सेवन केल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते आणि सिगारेटमुळे ते आणखी गंभीर होऊ शकते. सिगारेट आणि मद्यपान यांचे एकत्र सेवन केल्यास यकृताशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे स्वतःला बरे होण्यासही त्रास होतो.
3. कर्करोग वाढण्याचा धोका
मद्यपान आणि धूम्रपान या दोन्हींमुळे विविध प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकतात. यामुळे निर्माण होणारे धोके खूप जास्त आहेत. दोन्हीचे एकत्र सेवन केल्यास तोंड, घसा आणि अन्ननलिकेशी संबंधित गंभीर आणि धोकादायक आजार होऊ शकतात.
4. व्यसनामुळे समस्या निर्माण होतील
दारू आणि तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. दोन्ही व्यसनांचा मनावर वाईट परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला जर या दोन्हीचं व्यसन लागलं की त्यापासून मुक्ती मिळणं कठीण असतं. यामुळे तुम्हाला अनेक आजार देखील होऊ शकतात. एकदा हे आजार झाले की त्यापासून बरं होणं फार कठीण असतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :