Health Tips : आपल्या आयुष्यात रोजची धावपळ इतकी वाढलीय की त्यामुळे नीट झोपही लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. रात्रभर झोप नसल्याने अनेकांच्या डोळ्याभोवती काळे डाग दिसता, अनेकजण कामाच्या ठिकाणी जांभया देत असतात. झोप नीट न झाल्याचा परिणाम आपल्या कामावरही होतो आणि आरोग्यावरही. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी नेमकं काय करावं असा अनेकांना प्रश्न पडतोय. त्यासाठी अनेक उपाय आहेत, त्यापैकी एक उपाय म्हणजे अॅरोमाथेरेपी (Aromatherapy). झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी अॅरोमाथेरेपी चांगली मानली जाते. ही थेरेपी आहे तरी काय आणि याचा सुगंधाशी काय  संबंध आहे जाणून घेऊया.


झोपेचा आणि सुगंधाचा संबंध काय?


यापूवी  केलेल्या अनेक संशोधन असे दिसून आले की, सुगंधाचा आपल्या मूडवर आणि झोपेवर मोठा परिणाम होतो. जसे की ह्रदयाच्या वाढत्या ठोक्यापासून ते उच्च रक्तदाबापर्यंतच्या सर्व समस्यांवर लवेंडरचा वास फायदेशीर ठरतो. लवेंडरचा वास मूड शांत ठेवण्याकरीता आणि शांत झोपेसाठी उपयुक्त ठरतो. 


विविध सुगंध आणि त्यांचे परिणाम


अॅरोमाथेरेपीमध्ये विविध सुगंधाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ व्हॅनिला आणि लवेंडर. जे लोक झोपेची तक्रार करतात त्यांच्यासाठी  लवेंडरचा वास उपयुक्त ठरतो. अनेक संशोधनातून समोर आले आहे की, लवेंडरचा सुगंध उच्च रक्तदाब आणि चांगल्या झोपेसाठी  फायदेशीर ठरतो.


व्हॅनिलाचा सुगंध वाढवेल झोपेची गुणवत्ता


त्याचप्रमाणे व्हॅनिलाचा सुगंध देखील झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तणाव किंवा चिंताग्रस्त परिस्थितीत व्हॅनिलाचा सुगंध आरामदायक ठरतो. व्हॅनिलाचा वास रूग्णांना शांत करणे, आणि त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी वापरला जातो.


ही बातमी वाचा: