Weight Loss Trick : वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. काहीजण काटेकोरपणे डायटिंग करतात. तर, काहीजण जीममध्ये व्यायाम करत घाम गाळतात. यातच अनेकजण असेही आहेत, ज्यांना रात्रीच्या जेवणाला रामराम केल्यानं लवकर वजन कमी होईल असं वाटतं. तुम्ही पण असं करत असाल तर हे नक्की वाचा...
सकाळच्या नाश्ता आणि दुपारच्या जेवणाप्रमाणे रात्रीचं जेवणही अत्यंत महत्त्वाचं आहे. रात्रीचं जेवण नेहमी हलकं आणि पौष्टिक स्वरुपाचं असायला हवं. वजन कमी करायचं असेल. तर जेवणाच्या वेळा कशा पाळायला हव्यात आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवं, ते जाणून घ्या.
रात्रीचं जेवण टाळल्यानं वजन लवकर कमी होतं?
लवकर वजन कमी करण्यासाठी मुख्य तीन वेळेचं जेवण सोडू नये. बरेच लोक मुख्य जेवणाच्या जागी नाश्ता किंवा सॅलड खातात किंवा जेवणं टाळतात. यामुळे कॅलरीज कमी होण्यास मदत होते, परंतु बऱ्याच कालावधीनंतर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. शरीर प्रतिसाद देऊ लागते आणि तुमची ऊर्जा कमी होऊ लागते. जेवण वगळण्याऐवजी किंवा उपाशी राहण्याऐवजी, आपला आहार योग्यरित्या घेणे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
रात्रीच्या जेवणासाठी योग्य वेळ कोणती?
झोपण्याच्या किमान तीन तास आधी रात्रीचं जेवण घ्यायला हवं. रात्रीचं जेवण आणि झोपण्याच्या वेळेतील योग्य अंतर पाळणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही या वेळेचं काटेकोरपणे पालन केलं, तर तुम्हांला रात्रीचं जेवण टाळण्याची गरज पडणार नाही.
रात्रीचं जेवण टाळण्याचे तोटे :
- झोप पूर्ण न होणे.
- शरीरात विटॅमिनची कमतरता होणे.
- शरीरातील चयापचयाची क्रिया मंदावणे.
- उपाशीपोटी झोपल्यानं दुसऱ्या दिवशी अधिक भूक लागते. त्यामुळे अधिक खाल्याने वजन वाढू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha