Health Care Tips : एखाद्या व्यक्तीकडे चांगले धष्टपुष्ट शरीर असेल, मात्र मेंदुचे आरोग्य ठीक नसेल, तर अशा व्यक्तींना मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी तुम्हांला सुदृढ शरीरासोबतच मेंदुचा वापरही योग्यप्रकारे करता आला पाहिजे. तुमच्या मेंदूचं आरोग्य उत्तम असेल, तर तुम्ही कोणतेही काम सहजपणे पूर्ण करु शकता. मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात काही पोषक गोष्टींचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात, मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच बुद्धी तल्लख करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या पदार्थांबाबत...
भोपळ्याच्या बिया : भोपळ्याची भाजी आपण खातोच. यासोबतच भोपळ्यापासून बनणाऱ्या अनेक गोड पदार्थांचा आस्वादही तुम्ही घेतला असेल. मात्र, तुम्हांला भोपळ्याच्या बिया किती गुणकारी आहेत, हे ठाऊक नसेल. मेंदुचं आरोग्य जपण्यासाठी आणि बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचा वापर करु शकता. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने तुम्ही मेंदू तंदुरुस्त ठेवू शकता. भोपळ्यामध्ये असलेले झिंक मेंदूसाठी लाभदायक असते.
डार्क चॉकलेट : सध्याच्या युगात डार्क चॉकलेट सूपर फूडपैकी एक आहे. जर तुम्हांलाही डार्क चॉकलेट खायला आवडतं असेल, तर तुम्ही त्याचे फायदे नक्कीच जाणून घ्या. डार्क चॉकलेट तुमचे मेंदुचे कार्य प्रभावी करण्यासाठी आणि तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. डॉर्क चॉकलेटमधील अॅन्टीऑक्सिडेंड आणि कार्बनिक तत्त्व रक्तदाब नियंत्रित करण्यात उपयोगी आहेत.
ब्रोकली : मेंदुसाठी ब्रोकली गुणकारी आहे. ब्रोकलीमध्ये ओमेगा-3, फॅटी अॅसिड, लोह, तांबे यासारखी पोषकतत्वे आहेत. ही पोषकतत्वे तुमच्या मेंदुच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Good Health Care Tips : लिंबाचं अतिसेवनही अपायकारक; उद्भवतील 'या' समस्या
- Skin Care Tips: थंडीत त्वचा कोरडी पडते? मध आणि गुलाब पाण्याचा हा फेस पॅक चेहऱ्याला लावा, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
- Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे
- Good Health Care Tips : ग्लोइंग अन् हेल्दी स्किन हवीये? घरच्या घरी करा फेशिअल, 'या' स्टेप्स फॉलो करा