Health Care Tips : जंक फूड आरोग्यासाठी हानिकारक आहे. ज्यामुळे आपले वजन तर वाढतेच या व्यतिरिक्त आपल्या आरोग्यावरती आणि आपल्या पाचनशक्तीवरती देखील त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे लोकांना ते न खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. डॉक्टरांच्या मते चांगल आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जंक फूड खाणं आपण सोडलं पाहिजे आपल्या डॉक्टरांचे हे म्हणणे अनेकदा पटते सुद्धा परंतु तरीही जंक फूड सोडण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण ते सोडू शकत नाही.


पुरेसे पाणी प्या : शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्या. पाण्याने अन्नाची लालसा कमी करता येते. याशिवाय, यामुळे तुमची भूक शांत राहते.


कमी कालावधीत खा : जंक फूडची लालसा कमी करण्यासाठी, पौष्टिक अन्न कमी वेळाच्या अंतराने घ्यावे. मध्यम प्रमाणात खाल्ल्याने लालसा नियंत्रित केली जाऊ शकतो.


पुरेशी झोप घ्या : तज्ज्ञांच्या मते, पुरेशी झोप घेतलेल्या लोकांना कमी भूक लागते. याशिवाय गोड आणि खारट अन्न खाण्याची लालसादेखील होते.


नाश्ता वगळू नका : जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही, तर काही वेळानंतर तुम्हाला गोड किंवा जंक फूड खाण्याची लालसा निर्माण होते. या व्यतिरिक्त, जर तुम्ही जास्त तास उपाशी राहिलात, तर तुम्हाला चटपटीत गोष्टी खाण्याचे मन होते, म्हणूनच नाश्ता वगळू नये.


अन्न चावून खा : हे आपल्या पचनासाठी देखील चांगले आहे. ज्यामुळे आपल्याला चटपटीत खाण्याचे मन होत नाही.


संबंधित बातम्या


Omicron Variant Alert : हिवाळ्यात खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरातील 'या' वस्तूंचे करा सेवन


Vitamin D For Kids : मुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे हाडे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते, 'या' आजारांचा वाढतो धोका


Omicron in Kids : काळजी घ्या! चिमुकल्यांना ओमायक्रॉनचा अधिक धोका, लागण झालेल्या मुलांमध्ये 'ही' पाच लक्षणे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha