Walking Excercise Tips : निरोगी राहण्यासाठी शरीराची हालचाल होणे गरजेच आहे. चालणे हा व्यायामाचा (Walking) सोपा मार्ग आहे. तुम्ही दररोज तर व्यायाम न करता फक्त चालण्याची सवय लावली तरी, तुम्हाला खूप फायदा होईल. एका संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज 30 ते 40 मिनिटे चालणे आवश्यक आहे. काही पावले चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असून यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. निरोगी राहण्यासाठी लोक मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) जातात किंवा काही लोक संध्याकाळी वॉकला (Evening Walk) जातात. 


चालण्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चालत असाल किंवा चालताना काही चुका झाल्या तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालत असाल तर जाणून घ्या की चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? वॉक करताना तुम्ही कोणती चूक करता आणि त्यामध्ये कोणत्या सुधारणा करता येतील.


चालण्याचा वेग किती असावा?


जर तुम्ही दररोज 30 ते 40 मिनिटे चालत असाल तर तुमचा वेग ताशी 6.5 किमी असावा. तुमचे शरीर आणि वजनानुसार तुम्ही सामान्य गतीने चालू शकता, पण वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर जलद चालण्याची सवय लावा.


चालताना मूठ बंद करु नका


चालताना अनेकदा लोक नकळत हाताची मूठ घट्ट बंद करतात. चालताना बंद केल्याने त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. मूठ घट्ट बंद करुन चालल्याने शरीरावर दबाव निर्माण होतो आणि याचा हात, खांदे आणि मानेवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो. बोटांमध्ये सूज आणि वेदना जाणवू शकतात. म्हणूनच चालताना मूठ दाबू नका.


वॉक करताना हात कसे ठेवावेत?



  • चालताना हाताची मूठ उघडी ठेवून चाला.

  • दोन्ही हातांची बोटे थोडीशी आतील बाजूला वाकवा आणि तर्जनीवर अंगठ्याला विश्रांती देऊन चाला. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते.

  • छाती सरळ ठेवून, खांदे खाली आणि पाठ ताठ ठेवून चाला.

  • चालताना हात कोपरात 90 अंशांवर वाकवावेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Coronavirus : संसर्गातून बरे झाल्यानंतरही कोविडचा धोका कायम, 18 महिन्यानंतरही होऊ शकतो मृत्यू; धक्कादायक अहवाल समोर