स्वादिष्ट खाद्यपदार्थ खायला प्रत्येकालाच आवडते. पण काही खाद्यपदार्थ हे चवीला चांगले नसतील पण ते आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कडू खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतील.


कारले -
कारल्याची चव कितीही कडू असली तरी चांगल्या तब्येतीसाठी ते खूप चांगले असते. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अॅंटी-ऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतं. डायबिटीसच्या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही कारलं मदत करते.

कोको - कोकोत शक्तीशाली अँटी इनप्लिमेंट्रीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. जे कोलोस्ट्रोलची पातळी सुधारण्यास मदत करतात.

ग्रीन टी - ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हाडांना बळकट करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे फायदेशीर आहे.

लिंबाची पाने - फक्त लिंबूच नाही तर लिंबाच्या पानांचाही आपल्या सुदृढ तब्येतीसाठी फायदा होतो. लिंबाच्या पानांची चव कडू असते. त्यामुळेच त्यात प्लेव्होनॉइड असते. प्लेव्होनॉइडचे काम हे फळांमधील किड्यांपासून संरक्षण करणे आहे. आंबट फळांच्या पानांना चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे.