Health Care Tips : लठ्ठपणा आणि शरीराला सूज येणे म्हणजेच ब्लोटिंगच्या (Bloating) समस्येमुळे सध्याची तरुणाई अधिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. ब्लोटिंगमुळे तुम्ही केवळ लठ्ठ दिसत नाही तर त्वचेचं तेजही हेरावून घेते. आरोग्यावरही याचा परिणाम होतो आणि यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा 5 ते 7 वर्षांनी मोठे दिसू लागतात. मात्र, तीन सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही हे टाळू शकता. जाणून घ्या काय आहेत या टिप्स...
'या' आहेत सोप्या आणि प्रभावी टिप्स आहेत
1. शरीरातील साखर नियंत्रित करा : लठ्ठपणा आणि ब्लोटिंग टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रात्री किमान 7:30 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी झोपल्याने आणि 9 तासांपेक्षा जास्त झोपल्यानेही शरीराला त्रास होतो.
2. दररोज अडीच ते तीन लिटर पाणी प्या : दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा 10 वर्षांनी तरुण दिसू शकते. कारण आपल्या शरीराचा 70 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. अशा स्थितीत पाणी शरीराला ऊर्जा देण्यासोबतच त्वचेच्या आरोग्यासाठी आणि ग्लोसाठी टॉनिक म्हणून काम करते.
3. आरोग्याशी निगडीत सवयी नियमित ठेवा : सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ निश्चित असावी. यासोबतच जेवणाची वेळही निश्चित करावी. असे केल्याने तुमचे चयापचय सुरळीत राहते. त्याचा परिणाम तुमच्या ऊर्जेवर आणि त्वचेवर दिसून येतो.
असा होईल फायदा
- पुरेशी झोप घेतल्याने शरीराला अधिक साखरेची गरज भासत नाही. कारण शरीरात नैसर्गिक ऊर्जा असते आणि ऊर्जेसाठी साखरेच्या आधाराची गरज नसते. यासोबतच शरीराचे स्नायू शिथिल राहतात, त्यामुळे सूज येत नाही.
- जेव्हा शरीराला मुबलक प्रमाणात पाणी मिळते, तेव्हा आत असलेले सर्व विषारी घटक लघवी आणि घामाद्वारे बाहेर पडतात. यामुळे मुरुम आणि पोर्सची समस्या दूर होते. म्हणजेच तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार होते.
- खाण्यापिण्याची वेळ निश्चित केली की पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य सुरळीत राहते. तुम्ही अधिक उत्साही आणि आनंदी राहता. यामुळे शरीरातील आनंदी हार्मोन्सचा स्राव वाढतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर स्पष्टपणे दिसून येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- मिठाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कोणत्या लोकांनी मीठ कमी खावे...
- Health Tips : मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी होईल कमी; ट्राय करा हे घरगुती उपाय
- Health Tips : उन्हाळ्यात 'ही' फळे खाऊन वजन करा कमी, डाएटिंगची गरज भासणार नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha