Skin Care Tips : लवकरच उन्हाळ्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाल तुमच्या त्वचेची विशेष काळजी (Skin Care Tips) घ्यावी लागणार आहे. उन्हाळ्यात अनेक जण चेहरा सारखा थंड पाण्यानं धुतात. पण सतत चेहऱ्या धुतल्यानं चेहऱ्यावरील त्वचा खराब होते. जाणून घेऊयात एका दिवनसामधून किती वेळा चेहरा धुतला पाहिजे. 

सकाळी चेहरा धुवा. साकाळी चेहरा धुतल्यानंतर आळस निघून जातो. तसेच चेहऱ्याचे सेल्स अॅक्टिव्ह होतात. चेहऱ्यावरील पोर्स देखील स्वच्छ होतात. सकाळी चेहरा धुताना थंड पाण्याचा वापर करा. तसेच तुम्ही माइल्ड फेसवॉशचा देखील वापर करू शकता. त्वचा तेलकट असेल तर दुपारी चेहरा थंड पाण्यानं धुवा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन ऑइली स्किनसाठी वापरण्यात येणाऱ्या फेसवॉशचा देखील वापर करा. जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील धुळ निघून जाते. तुम्ही दिवसातून तीन वेळा चेहरा धुतला पाहिजे. 

फळांच्या ज्यूसचा वापरचेहऱ्याला विटॅमिन सी आणि विटॅमिन ई ही पोषक तत्वे असणाऱ्या फळांच्या ज्यूसचा वापर करा. गाजर, पपई, डाळिंब इत्यादी फळांचा ज्यूस तुम्ही चेहऱ्याला लाऊन चेहरा स्वच्छ करू शकता.  

चेहरा धुताना फेसवॉशचा कमी वापर करा फेसवॉशमध्ये केमिकलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दिवसातून एकदाच फेसवॉशचा वापर केला पाहिजे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha