Curd For Instant Glow : बहुतेक जण वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने आणि उपाय वापरुन त्वचेचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात. कधी महागडे ब्युटी प्रोडक्टस, कधी वेगवेगळ्या किंवा महागड्या ट्रीटमेंट करत अनेक जण त्वचा तजेलदार बनवण्यासाठी हजारो रुपये खर्च करताना दिसतात. पण तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेत सौंदर्य वाढवू शकता. यासाठी तुम्ही दह्याचा वापर करु शकता. दही त्वचा सुंदर आणि तजेलदार बनवण्याच अतिशय फायदेशीर आहे. दह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येईल, याचा परिणाम तुमच्या महागड्या क्रिम्सपेक्षाही चांगला असेल.


त्वचेवर दह्याचा वापर केल्याने कोणती फायदे होतील?



  • त्वचा मॉइस्चरायझ करते.

  • पिंपल्सची समस्या दूर करते.

  • सनबर्नची समस्या दूर करते.

  • त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते.

  • त्वचेवर तेज आणते.



अशा प्रकारे तयार करा दह्याचं फेसपॅक



  • एका वाटीत दोन चमचे दही, एक चमचा एलोवेरा जेल आणि दोन चमचे मुलतानी माती एकत्र करून पेस्टप्रमाणे तयार करा.

  • आता हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या.

  • 15 ते 20 मिनिटे राहू द्या त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि त्यानंतर गुलाबजल लावा.


दह्याने चेहऱ्यावर करा मसाज



  • रोज थोडे दही घेऊन चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करा. यानंतर चेहरा कोरडा होऊ द्या. चेहरा कोरडा झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. दररोज दह्याने चेहऱ्यावर केल्याने त्वचा चमकदार होईल.

  • दह्यामध्ये हळद आणि मध मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर झटपट चमक येते.

  • चेहऱ्याच्या मसाजसाठी एक टेबलस्पून दही, एक टेबलस्पून एलोवेरा जेल आणि थोडी हळद एकत्र मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर संबंधित बातम्या