Six Packs Side Effects: आजकाल अनेक तरुणांमध्ये सिक्स-पॅक्स, अ‍ॅब्सची क्रेझ दिसून येते. ज्यांना सिक्स-पॅक्स, अ‍ॅब्स असतात त्यांना पाहून लोक हेच म्हणतात की, ते किती फिट (Fit) आणि निरोगी (Healthy) आहेत. पण बऱ्याचदा सत्य काही वेगळं असतं. जरी सिक्स-पॅक्स, अ‍ॅब्स बघायला आकर्षक वाटत असले तरी त्याचे शरीरावर बरेट दुष्परिणाम दिसून येतात.


तुमचं शरीर टोन्ड आणि तंदुरुस्त दिसत असलं तरी सिक्स पॅक्सचे काही दुष्परिणाम देखील आहेत, ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. सोशल मीडियावर एका व्यक्तीने सिक्स-पॅक अ‍ॅब्सचे असे काही दुष्परिणाम सांगितले आहेत, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.


सिक्स-पॅक्स, अ‍ॅब्स असणारे खरंच तंदुरुस्त असतात का?


मिररच्या रिपोर्टनुसार, Quora वर रुबेन नावाच्या व्यक्तीने सिक्स-पॅक अ‍ॅब्सशी संबंधित काही नकारात्मक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने सांगितलं की, सिक्स-पॅक अ‍ॅब्स असले तर आपल्याला चांगलं वाटतं. पण त्याच्या अनेक नकारात्मक बाजूही (Negative Sides) आहेत. तुम्हाला दररोज समान आहार (Same Diet) घ्यावा लागेल. तुम्हाल मूड स्विंग्स होतील. सिक्स-पॅक अ‍ॅब्समुळे जरी तुम्ही तंदुरुस्त दिसत असाल तरी, तंदुरुस्त दिसणं आणि तंदुरुस्त असणं यात खूप फरक असल्याचं रुबेननं सांगितलं. अ‍ॅब्स बनवताना पाण्याचं सेवन कमी करावं लागतं, म्हणजे कमी पाणी प्यावं लागतं, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.


काय आहेत सिक्स-पॅक्स, अ‍ॅब्सचे दुष्परिणाम?


रुबेनने सांगितलं की, जेव्हा त्याने त्याचे सिक्स-पॅक्स पाहिले तेव्हा त्याला खूप बरं वाटलं. पण त्याला जाणवलं की सिक्स-पॅक्स अ‍ॅब्स मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला थकवा, अशक्तपणा जाणवतोय, झोप न लागणे, डिहायड्रेशन अशा काही समस्यांना सामोरं जावं लागतंय.


रुबेनच्या या पोस्टवर एका व्यक्तीने आक्षेपही व्यक्त केला आहे. सिक्स-पॅक्स, अ‍ॅब्स मिळवण्यासाठी पाणी पिणं कमी करणं हे 100 टक्के चुकीचं असल्याचं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. त्याने रुबेनला प्रत्युत्तर देताना म्हटलं, सिक्स-पॅक अ‍ॅब्स मिळवण्यासाठी, तुम्हाला खूप कष्ट करण्याची किंवा उपाशी राहण्याची गरज नाही आणि पाणी पिणंही अजिबात कमी करू नये. 


रुबेनच्या सोशल मीडिया पोस्टवर काय म्हणाले युजर्स?


रुबेनला प्रत्युत्तर देताना तो व्यक्ती पुढे म्हणाला, "मी अनेक वर्षांपासून जिमला गेलो नाही, पण तरीही मला सिक्स-पॅक्स अ‍ॅब्स आहेत. मी पण रोज जेवतो. सिक्स-पॅक्स अ‍ॅब्स मिळविण्यासाठी तुम्हाला जिममध्ये तासन्तास काम करण्याची किंवा पर्सनल ट्रेनर नेमण्याची गरज नाही. जबरदस्ती न आवडणारा डाएट घेण्याचीही गरज नसल्याचं युजरने म्हटलं.


त्याचवेळी आणखी एका व्यक्तीने सांगितलं की, सिक्स-पॅक्स अ‍ॅब्स मिळवण्यासाठी अनेकांना अनेक तास जिममध्ये घालवावे लागतात. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. व्यायाम आणि चांगला आहार घेतल्यास शरीर सुस्थितीत येऊ शकतं. मात्र, याची खात्री नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


World News: 31 वर्षांच्या महिलेने साठवले 12 कोटी रुपये! श्रीमंत होण्यासाठी सांगितले सेव्हिंगचे 5 फंडे