Heart Disease Causes : जर तुम्ही तुमच्या दिवसातील जास्त वेळ बसून घालवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एका अभ्यासात समोर आलं आहे की, अधिक वेळ बसून घालवणाऱ्या व्यक्तींना ह्रदयविकार होण्याचा अधिक धोका असतो. अधिक वेळ बसण्याची सवय हदयासंबंधित आजारांना आमंत्रण देते. जर तुम्हांलाही घरात किंवा ऑफिसमध्ये सुमारे आठ तास बसून काढत असाल, तर तुम्हांलाही हृदयविकार होण्याचा अधिक धोका संभवतो. जास्त वेळ बसणे तुमच्या शरीरासाठी नुकसानदायक आहे.


एका आंतरराष्ट्रीय अभ्यासामध्ये असं समोर आलं आहे की, जास्त वेळ बसणं तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. या संशोधनानुसार, जे लोक दिवसभर बसून जास्त वेळ घालवतात, अशा लोकांमध्ये मृत्यूचे आणि हृदयविकाराचे प्रमाण जगातील सामान्य लोकांपेक्षा जास्त आहे. तसेच जे लोक आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना हृदयासंबंधित इतर अनेक आजारांचा धोका (Cardiovascular Disease) संभवतो.


संशोधनाबाबत काय म्हणाले डॉक्टर?
डॉक्टरांचा याबाबत म्हटलं आहे की, आपलं शरीर नैसर्गिकरित्या बसण्यासाठी बनलेलं नाही. त्यामुळे असे केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. वाढत्या वयानुसार बसण्याचे वाईट परिणामही वाढतात. याचा अधिक त्रास  स्त्रियांपेक्षा पुरुषांना होतो. यावर उपाय म्हणून ऑफिसमध्ये उभं राहून मीटिंग घेण्याचा प्रयत्न करा, फोनवर बोलत असताना चालत राहा. त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होईल आणि हृदय आणि मन निरोगी राहिल.


योगासनं करणं उत्तम उपाय
योग (Yoga) हा सर्व प्रकारच्या आजारांवरील उत्तम उपाय आहे. तुम्ही ऑफिसच्या खुर्चीवर बसूनही अनेक योग करू शकता. जे तुमच्या शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामांपासून सुटका करेल. गायमुख आसन, मांडूका आसन, पवनमुक्त आसन आणि अनुलोम विलोम ही काही आसने आहेत. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator