Health Tips: डाळिंबाचे अनेक फायदे असून ते आरोग्यास लाभदायक आहे. आयुर्वेदात डाळिंबाचा वापर पारंपरिक उपचारासाठी हजारो वर्षांपासून करण्यात येत आहे. डाळिंबात प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट, पोटॅशियमसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यामुळेच डाळिंब खूप पौष्टिक असते. पण जर डाळिंब अतिप्रमाणात खाल्ले तर त्याचे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. डाळिंब अतिप्रमाणात खाल्याने नेमके काय दुष्परिणाम होतात हे पाहुया.
डाळिंबाचे दुष्परिणाम
अॅलर्जी: काही लोकांना डाळिंब खाल्यामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. या अॅलर्जीकडे गंभीरतेने लक्ष द्यायला हवे कारण दुर्लक्ष केल्यास ही अॅलर्जी जीवावर देखील बेतू शकते. जर अंगाला खाज येणे, सूज येणे, गळा दुखणे, पोट दुखणे तर कधी श्वास घ्यायला त्रास होणे, गळा सूजणे यासारखी लक्षणं दिसून येत असतील तर दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
मधुमेह: तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही डाळिंबापासून दूर राहायला हवे. डाळिंबात साखरेचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही डाळिंब खाल्ले तर मधुमेह वाढू शकतो. त्यामुळे अनेक शारिरीक त्रास होऊ शकतात.
हाय कॅलरी: जर तुम्ही डाएटवर असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डाळिंब खाणे टाळळं पाहिजे. कारण डाळिंबात कॅलरीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डाळिंब जास्त खाल्ले तर तुम्ही जास्त कॅलरी कंज्युम कराल आणि तुमचे वजन आणखी वाढण्याची शक्यता असते.
पचनासंबंधित समस्या - डाळिंब जास्त खाल्ले तर पचनासंबंधित समस्येला सामोरे जावे लागेल. उल्टी आणि पोटात दुखण्याच्या समस्या होऊ शकतात. तसेच अॅसिडिटी झालेली असताना डाळिंब खाता कामा नये. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.