Health Tips: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) 40 वर्षांची झालेली आहे. पण तुम्ही तिच्या फिटनेमुळे तिच्या वयाचा योग्य अंदाज बांधू शकत नाही. ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच तिचं काही मोठ्या प्रोजेक्टवर काम देखील सुरू आहे. नुकतीच ती दुसऱ्यांदा आई झालेली आहे. इतक्या लवकर ती आपले वजन कसे कमी करते यागोष्टीवरून तिचे फॅन्स हैराण झालेले आहेत. करीनाचे फॅन्स नेहमी तिला सोशल मीडियावर तिच्या फिटनेसमागचं रहस्य विचारत असतात. आज आम्ही तुम्हाला तिच्या फिटनेसमागचं रहस्य सांगणार आहोत.
खरेतर करीना कपूर दोन मुलांची आई आहे. पण जेव्हा फिटनेशची गोष्ट येते तेव्हा ती तरूण अभिनेत्रींना देखील मागे टाकते. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासोबतच फिटनेसप्रेमी असलेल्या करीनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
करीना कपूर खानचा डाएट प्लॅन
1. दिवसाची सुरूवात ती सकाळी 9-10 भिजवलेले बदाम खाऊन करते.
2. त्यानंतर ती वर्कआउट करते आणि जिममध्ये जाऊन घाम गाळते.
3. नंतर ती दही, भात, पनीरची भाजी आणि पापड खाते.
4. संध्याकाळी 5-6 च्या दरम्यान ती मिल्कशेक पिते.
5. करीना 8 वाजता रात्रीचे जेवण करते. यात बुंदी रायता, पुदिन्याची चपाती, भाजी, वरण-भात यांचा समावेश असतो.
6. करीना कपूर खान झोपण्यापूर्वी हळदीचे दूध जायफळ घालून पिते. जायफळमध्ये चांगल्या दर्जाचे फायबर असते, जे वजन कमी करणाऱ्या व्यक्तीस फायदेशीर ठरते.