मुंबई: पिझ्झा, बर्गर आणि बेकरी उत्पादनांच्या अधिक सेवनाने सर्वसामान्यांच्या मृत्यूचा धोका वाढतोय. दरवर्षी 5 लाख 40 हजार जण यामुळे बळी पडत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी संसदेत दिली आहे. त्यामुळे मेदापासून बनलेला पिझ्झा आणि बर्गर हे अनेकांना जीवघेणे ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


अपायकारक मेदानं घेतले अनेकांचे जीव


मेदामुळे दरवर्षी 5 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. अपायकारक मेदा म्हणजेच ट्रान्स फॅटी ॲसिडमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो अशा प्रकारची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे. पिझ्झा, बर्गर, बेकरी उत्पादने सोबतच स्वयंपाकात वापरले जाणारे विविध प्रकारचे तेल, सॉस, जॅमसारख्या माध्यमातून मेद शरीरात जातात. 
 
पिझ्झा आणि बर्गर तसेच बेकरी प्रोडक्टवर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत तुटून पडताना दिसता. पण आपल्या पोटात जो पिझ्झा जातो शरीरासाठी हानिकारक आहे. यात ह्या सर्व गोष्टी आहेत ज्यामुळे ट्रान्स फॅटी ॲसिड शरीरात जातात. ट्रान्स फॅटचे जास्त सेवन केल्याने मृत्यू होण्याचा धोका 34 टक्के आणि हृदयविकारानं मृत्यू होण्याचा धोका 28 टक्के वाढू शकतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. दरम्यान, हे ट्रान्स फॅटी ॲसिड म्हणजेच अपायकारक मेदा तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतो हे डॉक्टर वेळोवेळी सांगतात. 


अपायकारक मेदामुळे शरीराचं नुकसा


जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे पाच अब्ज नागरिकांना अपायकारक मेदामुळे (ट्रान्स फॅट) हृदयविकाराच्या धोक्याला सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात या नागरिकांना तीव्र हृदय विकार, हृदयविकाराचा झटका येण्याचा तसेच मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचं म्हटलंय. 


भारतातील 4.6 टक्के हृदयरोगाचे मृत्यू ट्रान्स-फॅटी अॅसिडच्या सेवनाने संबंधित असू शकतात अशी भीती मांडविय यांनी व्यक्त केली आहे. 


अपायकारक मेदाच्या निर्मूलनासाठी सर्व प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामध्ये एकूण चरबीच्या (फॅट) प्रमाणात अपायकारक मेद हे केवळ 2 टक्के किंवा त्याहून कमी असावे. तसेच, मेदाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या हायड्रोजनेटेड तेलांच्या वापरावर घटक पदार्थ म्हणून कठोर बंदी लागू करण्यात यावी असे डब्ल्यूएचओकडून सुचवण्यात आलं आहे. 


प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ विकत घेताना, त्यांचे सेवन करताना नागरिकांनीही या गोष्टींकडे लक्ष द्यावे असे आवाहनही केलंय.  


प्रक्रिया केलेल्या आहारातून मानवी शरीरात शिरकाव करणारे अपायकारक मेद हे अनेक आजारांना निमंत्रण देतात. त्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओनं 2018 पर्यंत अपायकारक मेदाच्या निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, आता त्यासाठी 2023 हे वर्ष निश्चित करण्यात आले आहे. अपायकारक मेद निर्मूलनाचे बहुतांश प्रयत्न आणि त्यासाठी धोरण निश्चितीत भारतानं देखील पुढाकार घेतला असून तसे प्रयत्न सुरु केले आहेत. 


त्यामुळे आपल्या पोटात जाणारा पिझ्झा अनेक आजारांना निमंत्रण देण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल आणि हृदयरोगापासून दूर राहायचं असेल तर व्यायाम करा आणि जंक फूड टाळा.


ही बातमी वाचा :