Health Tips : पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. देशभरात कोरोनाची आणखी एक लाट आल्याची चर्चा सुरु आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशभरात 90 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही भर टाकली आहे. डिसेंबर 2021 च्या अखेरच्या आठवड्यापासून जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णाची संख्या सहा हजारांवरुन 90 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोनाचा स्फोट झाला आहे. अशातच बदलत्या हवामानामुळेही आजारी पडलेल्या अनेकांना रुग्णालयात जावे लागते, त्यामुळे कोरोना होण्याची भीती वाढते. आशा परिस्थितीत रुग्णालयात जाताना काय काळजी घ्यावी? याबाबतची आपण माहिती जाणून घेणार आहोत.  


Appointment (अपॉइंटमेंट) घेऊन जाण्याचा प्रयत्न करा - 
वाढते कोरोना रुग्ण आणि ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात गर्दी आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे थोडं कठीण जात आहे. अशा परिस्थिती डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. 


या गोष्टी सोबत घेऊन जा -
रुग्णालयात जाताना डबल मास्कचा वापर करायला विसरु नका. त्याशिवाय Gloves, सॅनिटाईजर, रुमाल यासारख्या गोष्टी सोबत घेऊन जा. शक्य असल्यात शील्ड घेऊन जाऊ शकतात.  


शक्य असल्यास डॉक्टरांकडे एकटेच जा. अथवा एका व्यक्तीला घेऊन रुग्णालयात जावे. विनाकरण जास्त लोकांना घेऊन रुग्णालयात जाऊ नये. 


कुठेही उभे राहू नका -
रुग्णालयात गेल्यानंतर कुठेही हात लावू नका. भिंतीला टेकून उभं राहणे टाळा. 


मास्क, सोशल डिस्टन्सिंग -
घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर कराच, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करा.  गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live