Nithin Kamath Latest News:  2020 मध्ये भारतातील झिरोदा ही यूनिकॉर्नचा  दर्जा प्राप्त करणारी एक कंपनी बनली आणि कोकणी परिवारात जन्मलेले नितीन कामत हे नाव जगभरात पोहोचलं.  फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या टॉप 100 यादीत ते आले. याच नितीन कामतांनी आरोग्याविषयी काही महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहेत. ज्याची सध्या खूप चर्चा सुरु आहे.


नितीन कामत यांनी एक ट्विटर थ्रेड केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जसे आपण 'मोठे' होतो तसे आपलं आरोग्य आपला दर्जा  ठरवतो, पैसा नाही.  मी गेली काही वर्षे आरोग्याविषयी थोडा विचार केला आहे. माझ्यासोबत आणि आमच्या टीमसोबत प्रयोग देखील करत आहे. मी काही स्टार्टअप्सना पाठिंबा देत आहे जे भारतीयांना निरोगी करण्यासाठी मदत करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 






नितीन कामत यांनी म्हटलं आहे की, पैशांसंदर्भातील ध्येयांचा पाठलाग करताना हे लक्षात घेणं आवश्यक आहे की,  पैसे चांगले आरोग्य विकत घेऊ शकत नाहीत. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपले आरोग्य आपल्या जीवनाचा दर्जा ठरवते, पैसा नाही.  
 
कामत यांनी म्हटलं आहे की, फक्त दिसणं महत्वाचं नाही तर आपण निरोगी कसे राहू हे महत्वाचे आहे. सेलिब्रिटी  लोकांचा अनेकांवर प्रभाव असतो. मात्र ते झगमगाट आणि केवळ फोटोंद्वारे फक्त दाखवत असतात. ते सुंदर दिसण्यासाठी आरोग्यासोबत प्रयोग करतात, जे चुकीचं आहे. 
 
त्यांनी म्हटलं की, बसून राहणे हे देखील नवीन प्रकारचे धूम्रपान आहे. आपण काम करताना किती हालचाल करतो हे महत्वाचं. सतत बसलेलो असेल दर 45 मिनिटांनी उभे राहून काम करण्यानं माझ्या लाईफस्टाईलवर चांगला परिणाम झाला. त्यांनी सांगितलं की, रात्री 9 वाजता झोपणे आणि सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करणे माझ्यासाठी उपयुक्त ठरले आहे. लवकर झोपल्याने आपल्या आत्म-नियंत्रणासाठी खूप फायदा होतो. तेव्हा द्विधा मनस्थितीची शक्यता कमी होते. सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर आरोग्यदायी काम करण्याची शक्यता वाढते. 
 
ते म्हणातात, मला वाटतं कमी झोपणं आणि जास्त काम करणं हे गौरवास्पद आहे. आयुष्य मॅरेथॉन सारखे आहे; जर तुम्ही जग वेगाने धावत असेल आणि स्वत:ला गती दिली नाही, तर तुम्ही संपू शकता. रोज झोपण्याआधी   1 तास मोबाईल, लॅपटॉप अशी सर्व उपकरणे बाजूला ठेवत आपले छंद जोपासा, आपल्या मुलांबरोबर वेळ घालवा, असा सल्ला देखील नितीन कामत यांनी दिला आहे.