Health Care: अनेकांचे असे मतं असते की डाएटिंग केल्याने वजन कमी होते. डाएटिंग करत असताना अनेक कमी प्रमाणात खातात. काही लोक जिममध्ये जाऊन वजन कमी वर्क आऊट करतात. त्याने देखील शरीरातील चरबी कमी होतो. जाणून घेऊयात डाएटिंग न करता झटपट वजन कमी करण्याची सोपी पद्धत-
ज्यूस ऐवजी फळं खा- अनेक लोक डाएटिंग करत असताना ज्यूस पितात. पण ज्यूस ऐवजी फळे खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण फळांमध्ये कॅलोरी इनटेक कमी असते. ज्यामुळे वजन जास्त वाढत नाही.
डाएटला मॅनेज करा- अनेक वेळा आपण जेवणाची टेस्ट चांगली असेल तर जास्त प्रमाणात जेवतो. पण जास्त खाल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात. आणि त्यामुळे वजन देखील वाढते. त्यामुळे जेवण जास्त प्रमाणात करू नये. प्रमाणात जेवल्याने तुमच्या शरारीची चरबी वाढणार नाही.
उपाशी राहण्यापेक्षा थोडा वेळ ब्रेक घेत खावे- डाएटिंग करत असताना अनेक लोक बराच वेळ उपाशी राहतात. पण त्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. कमी प्रमाणात आणि ब्रेक घेत खाल्याने तुमचे वजन देखील कमी होईल आणि तुम्हाला अशक्तपणा, थकवा आणि चक्कर देखील येणार नाही.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
जंक फूड कमी प्रमाणात खावे- वजन कमी करण्यासाठी अनेक डाएटिंग करत असताना जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे टाळतात. पण जरी तुम्ही जंक फूड किंवा फास्ट पूड खाल्ले तर त्यानंतर भरपूण पाणी प्यावे. पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात. दिवसभरात पाणी पित राहावे.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )