Men Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण, अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं, कुटुंबाला वेळ देणं या सर्वांमध्ये पुरूष मंडळी आपल्या आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. अनेक समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलत देखील नाही. आजच्या काळात पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेची समस्या वाढत असल्याचे दिसते. पुरुषांच्या प्रजननक्षमतेबद्दल आपल्या समाजात क्वचितच बोलले जाते, कारण अनेकांना पुरुषांमधील प्रजननक्षमतेची समस्या लज्जास्पद वाटते, परंतु त्याबद्दल न बोलणे ही चिंतेची बाब असू शकते. आजच्या काळात प्रत्येकामध्ये काही ना काही शारीरिक कमतरता असते. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे घट्ट कपडे घालणे. अशी प्रकरणे भारतात सातत्याने वाढत आहेत, ज्याकडे कधी कधी दुर्लक्ष केले जाते. जाणून घेऊया याविषयी आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?


आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?


एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. अश्वती नायर यांनी सांगितले की, पुरुष प्रजननक्षमतेच्या बाबतीत घट्ट कपडे घालणे चांगले मानले जात नाही. अनेक शास्त्रज्ञांना अभ्यासातून असे आढळून आले आहे की, घट्ट कपडे परिधान केल्याने कंबरेमध्ये जास्त उष्णता निर्माण होते, ज्याचा शुक्राणूंवर नकारात्मक परिणाम होतो. शुक्राणू निरोगी ठेवण्यासाठी, कंबरेभोवती योग्य तापमान राखणे महत्वाचे आहे. घट्ट कपड्यांमुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि म्हणूनच पुरुषांनी घट्ट कपड्यांऐवजी आरामदायक आणि सैल-फिटिंग कपडे घालावेत.


किती वेळ घालणे योग्य आहे?


डॉक्टर सांगतात, काही मिनिटे किंवा तासासारख्या कमी कालावधीसाठी घट्ट कपडे परिधान केल्याने कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. तथापि, दिवसभरात 7 ते 8 तासांपेक्षा जास्त काळ ते परिधान केल्याने उष्णता आणि दबाव वाढू शकतो, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे कपडे वापरणे शक्यतो टाळावे हे लक्षात ठेवा.


अनुवांशिक समस्या उद्भवतात?


पुरुषांच्या प्रजनन क्षमतेशी संबंधित समस्या आनुवंशिकतेमुळे देखील उद्भवू शकतात, परंतु जीवनशैलीशी संबंधित गोष्टी जसे की घट्ट कपडे घालणे, धूम्रपान करणे, दारू पिणे आणि वाढलेला ताण देखील शुक्राणूंच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो.


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )