Energy Tips : दिवसभर कार्य करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची (Energy) आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला अन्नपदार्थातून मिळते. यासाठी आपल्या योग्य पौष्टीक आहार घेणं फार आवश्यक आहे. अनेक वेळा आपण खालेल्या अन्नपदार्थातून आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. यामुळे आपल्याला अधिक थकवा जाणवतो. हा थकवा दूर करून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळावी यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन केल्यास तुम्हाला नक्की
फायदा होईल. काही वेळा अचानक एनर्जी कमी झाल्याचं वाटतं आणि थकवा येतो. अशा वेळी या पाच पदार्थांचं सेवन केल्याने तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळेल.
शरीरातील ऊर्जा कमी झाल्याची लक्षणं
- कोणतंही काम करण्यास थकवा.
- दिवसभर आळस वाटणे.
- थकवा जाणवणे.
- कोणत्याही कामात मन न लागणे.
- काम करताना लवकर थकणे.
या पदार्थांचं सेवन नक्की करा, होईल फायदा
1. केळी : झटपट एनर्जी मिळवण्यासाठी केळीचा आहारात समावेश करावा. जर तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल तर केळी खा. हे असे फळ आहे, जे सर्वांनाच आवडते. लहान मुलांचा आवडता आहार म्हणजे केळी.
2. कॉफी : एनर्जी ड्रिंकमध्ये कॉफीचाही समावेश होतो. जर तुम्हाला एनर्जी कमी वाटत असेल, थकवा जाणवत असेल तर कॉफी प्या. कॉफी प्यायल्याने थकवा, झोप आणि उर्जेची कमतरता दूर होते. कॉफी हा ऊर्जेचा चांगला स्रोत मानला जातो.
3. ब्राऊन राइस : तुमच्या शरीरात ऊर्जेची अर्थात एनर्जीची कमतरता असल्यास तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता. ब्राऊन राइसमध्ये अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते. साध्या भाताऐवजी ब्राऊन राइस खा. यामुळे ऊर्जा त्वरीत ऊर्जा मिळेल.
4. रताळं : झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळं
आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. रताळं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. रताळं खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते.
5. खजूर : जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही खजूर खाऊ शकता. यामध्ये नैसर्गिक साखर असते जी तुम्हाला त्वरित ऊर्जा देते. दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी रोज चार ते पाच खजूर खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या