Independence Day 2024 : 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात उत्साहाची लाट पाहायला मिळते, कुठे ध्वजारोहण, कुठे राष्ट्रगीत, कुठे लाऊडस्पीकरवर देशभक्तीची गाणी, तर कुठे पतंगबाजी.. अशा प्रकारे संपूर्ण देशात वातावरण अगदी देशभक्तीमय झालेले असते. भारत यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या निमित्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पतंग उडवायला आवडते. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पतंग उडविणे हा केवळ एक छंद नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय आरोग्यदायी व्यायाम आहे. याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हीही स्वातंत्र्यदिनी पतंग उडवण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.


 


पतंग उडवण्याचे काही आश्चर्यकारक फायदे


15 ऑगस्टला आकाशात अनेक रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळतात. स्वातंत्र्याचा हा विशेष दिवस लोकांना अनेक प्रकारे साजरा करायला आवडतो, त्यातील एक म्हणजे पतंग उडवणे. लहान मुले असो किंवा मोठी माणसं, प्रत्येकजण या दिवसासाठी बरेच पतंग अगोदरच खरेदी करून ठेवतो, जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर आता आनंदी व्हा. कारण आज आम्ही तुम्हाला पतंग उडवण्याचे काही आश्चर्यकारक फायद्यांची ओळख करून देणार आहोत


 


वजन कमी करण्यास उपयुक्त


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पतंग उडवल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर 15 ऑगस्टच्या या खास प्रसंगी तुम्ही आळस बाजूला ठेवून पतंग उडवू शकता. पतंग उडवताना तुमचे स्नायू सक्रिय राहतात, ज्यामुळे संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम मिळतो.


 


भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळवा


पतंग उडवण्यासाठी तुम्हाला सूर्यप्रकाशात उभे राहावे लागते, त्यामुळे तुमचा हा छंद शरीरात व्हिटॅमिन डीचा पुरवठा होण्यास मदत करतो. त्यामुळे बिनदिक्कतपणे खुल्या आकाशाखाली पतंग उडवावेत.


 


फोकस वाढवण्यासाठी फायदेशीर


पतंग उडवताना खूप एकाग्रता लागते. अशा परिस्थितीत, एखाद्या गोष्टीपासून विचलित होण्यापासून रोखण्यासाठी देखील हा एक चांगला व्यायाम असल्याचे सिद्ध होते. 15 ऑगस्ट व्यतिरिक्त तुम्ही दररोज काही वेळ पतंग उडवल्यास एकाग्रता वाढते आणि विशेषतः अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी ते फायदेशीर ठरते.


 


तणाव दूर होतो


पतंग उडवण्याचा छंदही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे चिंता आणि तणाव दूर होतो, कारण तुमचे संपूर्ण लक्ष या मजेदार अनुभवाचा आनंद घेण्यावर असते. तुमचा विश्वास बसत नसेल तर पतंग उडवणाऱ्या व्यक्तीकडे बारकाईने पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की तो इतर गोष्टींची चिंता न करता त्याच्या पतंग उडवण्यामागे हरवला आहे.


 


फुफ्फुस निरोगी ठेवते


पतंग उडवल्याने तुमची फुफ्फुसही निरोगी राहते. या दरम्यान, तुमचे तोंड आकाशाकडे म्हणजेच वरच्या दिशेने असते, त्यामुळे श्वासोच्छवासाचा चांगला व्यायाम होतो आणि शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठाही होतो.


 


हेही वाचा:


Health : लोक हमखास दुर्लक्ष करतात! 'या' गोष्टींमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, 'अशी' काळजी घ्या..


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )