Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु झाल्यामुळे व्हायरल फ्लू (Viral Flu) सारख्या आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. बदलत्या मोसमामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. कोरोना, सर्दी आणि व्हायरल फ्लू यांची लक्षणं साधारणपणे समान असतात. पण अधिक लक्ष दिल्यास या लक्षणांमधील फरक ओळखता येतो. या तीन आजारांच्या लक्षणांमधील फरक जाणून घ्या.


ऍलर्जीची लक्षणं (Seasonal Allergy Symptoms)
या मोसमात अनेकांना ऍलर्जी होते, त्याची लक्षणं जाणून घ्या.



  • डोळ्यातून पाणी येणे आणि डोळे चुरचुरणे. 

  • घसा खवखवणे.

  • कानात खाज येणे.

  • नाक बंद होणे किंवा सर्दी होणे.

  • शिंका येणे.

  • सर्दीची लक्षणं दिसणे.

  • खोकला येणे.


साधारण फ्लूची लक्षणं (Common Flu Symptoms)



  • तीव्र किंवा सौम्य ताप

  • खोकला आणि घसा खवखवणे

  • नाक बंद होणे किंवा सर्दी होणे.

  • डोकेदुखी किंवा अंगदुखी.


कोरोनाची लक्षणं (Corona Symptoms)
कोरोना झाल्यास खूप थकवा जाणवतो. जर तुम्हाला याआधी कधी फ्लू झाला असेल, तर तुम्हाला कळेल की कोरोना झाल्यास ताप येऊन खूप थकवा येतो. पण फ्लूमध्ये असं होतं नाही.



  • खोकला आणि घसा खवखवणे.

  • सर्दी होणे.

  • रात्री घाम येणे.

  • चव आणि वास न येणे.

  • डोकेदुखी आणि अंगदुखी


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :