Holiday Heart Syndrome : नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. आधी नाताळ आणि नंतर नवीन वर्षाचा उत्साह आणि जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत आहे. सर्वजण न्यू इअर सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) वेगवेगळे प्लॅन करताना दिसत आहेत. पण या उत्साहाच्या वातावरणात तुमची छोटीशी चूक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सध्या ह्रदयासंबंधित आजाराचे प्रमाण वाढले आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांमध्ये ह्रदयविकारामुळे (Heart Problems) मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्या सुट्ट्यांचा सीझन सुरु आहे. या काळात हार्ट अटॅकचा धोका असतो. या काळात हॉलिडे हार्ट सिंड्रोम नावाच्या आजाराचा धोका अधिक असतो.


हॉलिडे हार्ट सिंड्रोममुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे उत्सवाच्या काळात खाण्या-पिण्याकडे केलेले दुर्लक्ष. उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात लोक खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींकडून दुर्लक्ष करुन कोणतीही बंधने न पाळत कोणत्याही पदार्थांचे सेवन करतात. यामुळे हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा धोका बळावतो.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोक लांब सुट्ट्या किंवा उत्सवावेळी आहाराकडे दुर्लक्ष करतात. बहुतेक लोक या वेळी तेलकट, मीठयुक्त, साखरयुक्त पदार्थांचे सेवन अधिक करतात. तसेच दारुचे म्हणजे अल्कोहोलचे सेवनही मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे अचानक ह्रदयावर ताण पडतो आणि त्यांचे कार्य मंदावते. या परिस्थितीमध्ये ह्रदयविकाराची झटका येण्याची शक्यता जास्त असते. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करताना या निष्काळजीपणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 15 टक्क्यांनी वाढतो, असे संशोधकांना आढळून आले आहे. 


हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?


हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे सुट्टीवर असताना उद्भवणार्‍या गंभीर हृदयासंबंधित समस्या आहे. हृदयविकाराची समस्या वर्षाच्या कोणत्याही वेळी उद्भवू शकते, पण हॉलिडे हार्ट सिंड्रोम ही समस्या सहसा सुट्टीच्या काळात उद्भवते. सुट्ट्यांच्या काळात लोकांमध्ये तेलकट, तिखट म्हणजेच जास्त कॅलरीच्या आहाराचे सेवन आणि अल्कोहोलयुक्त पेये यांचे सेवन यामध्ये लक्षणीय वाढ होते. यामुळे हृदयाचे ठोके वाढण्याचा त्रास जाणवू शकतो. याची वेळीच काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका असतो.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हॉलिडे हार्ट सिंड्रोमपासून आपला बचाव करण्यासाठी सण-उत्सवाच्या काळात सर्वांनी आपल्या खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.


आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?


अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या ह्रदयरोग तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोकांसाठी सुट्ट्या म्हणजे खाणे-पिणे आणि अल्कोहोलचे सेवन करणे हा असतो. आहारामध्ये अधिक प्रमाणात मीठ, साखर किंवा जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने ह्रदयावर परिणाम होतो. यामुळे ह्रदयाची कार्य करण्याची क्षमता बदलते. ह्रदयाचे ठोके कमी होतात, परिणामी ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.