Coronavirus Risk for Blood Group : कोरोनाच्या (Covid19) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या BF.7 सबव्हेरियंटचा (BF.7 Variant) संसर्ग जगभरात वेगाने होताना दिसत आहे. दरम्यान, विशिष्ट रक्तगट (Blood Group) असणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी किंवा जास्त असे संशोधनात समोर आले आहे. चीन (China), जपान (Japan) आणि ब्राझीलसह (Brazil) इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. BF.7 संक्रमित रुग्णांमध्ये गंभीर लक्षण दिसण्याचे प्रमाण जास्त नाही, पण रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी हा विषाणू जीवघेणा ठरत आहे. भारतात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला, तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करु नये. योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.  


एका अहवालानुसार, विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असू शकतो. दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलने एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तीन रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी असतो, असेही म्हटले आहे. 


रक्तगट आणि कोरोना संसर्ग यावर संशोधन


सर गंगाराम रुग्णालयाच्या संशोधनामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत रूग्णालयात दाखल झालेल्यांचा समावेश आहे. सहा महिन्यांच्या कालावधीवर आधारित हे संशोधन करण्यात आले. त्यानुसार, A रक्तगट, B रक्तगट आणि Rh पॉझिटिव्ह (RH+) रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो.


कोणत्या रक्तगटाला कोरोनाचा धोका जास्त?


संशोधनानुसार, A रक्तगट असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण 29.93 टक्के होते. B रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना होण्याचा धोका 41.8 टक्के तर, O रक्तगट असलेल्यांना 21.19 टक्के होता. यासोबतच AB रक्तगट असलेल्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 7.89 होते.


RH+ पॉझिटिव्ह लोकांना अधिक धोका


आरएच फॅक्टर (RH) हे रक्तामध्ये आढळणारे जो प्रथिन आहे. ज्या लोकांचे रक्तामध्ये आरएच आढळते, त्यांच्या रक्ताला आरएच पॉझिटिव्ह  (RH+ Blood Group) म्हणतात. ज्या लोकांच्या रक्तात आरएच फॅक्टर नसतो त्यांना आरएच निगेटिव्ह (RH- Blood Group) म्हणतात. संशोधनानुसार, ज्या लोकांचा रक्तगट A आणि B आहे किंवा ज्यांचे RH+ पॉझिटिव्ह आहेत त्यांना कोविड संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तर, आरएच निगेटिव्ह (RH- Blood Group) लोकांना कोरोनाचा धोका कमी असतो.


पुरुषांना संसर्ग होण्याचा धोका जास्त


संशोधनात असेही आढळून आले की बी रक्तगट (B Blood Group) असलेल्या पुरुषांना महिलांपेक्षा कोरोना विषाणूचा संसर्घ होण्याचा धोका जास्त असतो. तसेच, एबी रक्तगट (AB Blood Group)असलेल्या 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये देखील संसर्गाचा धोका जास्त असतो. ए रक्तगट (A Blood Group)आणि आरएच पॉझिटिव्ह रक्तगट (RH+ Blood Group) असलेल्या लोकांना कोरोना विषाणूची बाधा लवकर होते आणि त्यांना बरे होण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.