What Is Brain Fog : आपल्या सर्वांनाच माहीत आहे की काही आजार हे शारीरिक असतात तर काही आजार मानसिक असतात. ब्रेन फॉग (Brain Fog) हा यापैकीच एक आहे. हा एक मानसिक स्थितीचा (Mental Health) प्रकार आहे ज्याला कॉग फॉग असं देखील म्हणतात. या मानसिक स्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. या व्यक्तींची निर्णय घेण्याची क्षमता देखील कमी होत जाते. यामुळे व्यक्तीला दैनंदिन जीवनात फार अडचणींचा सामना करावा लागतो. या अवस्थेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला कोणतीच गोष्ट लक्षात राहत नाही.
इतकंच नाही तर या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती कोणतीही गोष्ट बनवताना गोंधळात असतात. मग ते अन्नपदार्थ बनवणं असो किंवा दिवसातील कोणतीही एक्टिव्हिटी असो. या व्यक्तींना भाषा समजण्यातही अडचण निर्माण होते. एकंदरीतच, ब्रेन फॉग ही एक गोंधळाची परिस्थिती आहे. या परिस्थितीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
ब्रेन फॉगची अनेक कारणे आहेत. कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये ही स्थिती मोठ्या प्रमाणात आढळून येतेय. याशिवाय, त्याच्या काही मुख्य कारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- अतिविचार करणे
- जास्त काम न करणे
- विश्रांती न घेणे
- पुरेशी झोप न मिळणे
- खूप जास्त ताण घेणे
- अयोग्य आहार घेणे
ब्रेन फॉग कसा ओळखायचा?
ब्रेन फॉग ओळखण्यासाठी कोणतेही विशिष्ट निदान नाही, परंतु त्याची लक्षणे समजून घेतल्यास त्याचे उपचार सहज शक्य आहेत. खालील लक्षणांवरून तुम्ही ते ओळखू शकता.
- धाप लागणे
- अपुरी झोप
- गोंधळून जाणे
- एकाग्रतेचा अभाव
- कमकुवत स्मृती
- धूसर दृष्टी
- थकवा आणि आळस
- गोंधळलेली मानसिक परिस्थिती
- संभाषणात अडचण
- काम करण्याची क्षमता कमी होणे
ब्रेग फॉगपासून संरक्षण कसं कराल?
जर तुम्हाला ब्रेग फॉगपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या, पुरेशी झोप घ्या, काम करताना नियमित ब्रेक घ्या, योगासने आणि ध्यान करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. या काळात खाण्यापिण्याच्या सवयींवर मोठा परिणाम होतो. ब्रेन फॉगचा आहारावर परिणाम होतो. जास्त प्रमाणात साखर किंवा कार्ब खाल्ल्याने रक्तातील साखर क्रॅश होऊ शकते, ज्यामुळे ब्रेन फॉगची लक्षणे वाढू शकतात. अशा परिस्थितीत योग्य आहार घेतल्याने ब्रेन फॉग वाढण्यापासून रोखले जाऊ शकते.
ब्रेन फॉग टाळण्यासाठी तुम्ही 'या' पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
- बेरीज : ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी
- ओमेगा 3 समृद्ध मासे
- हिरव्या पालेभाज्या : पालक, मेथी
- लिंबूवर्गीय फळे : संत्री, लिंबू, द्राक्षे इ.
- नट्स आणि बिया : अक्रोड
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या