Health Tips : ओव्हेरियन कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा अंडाशयातील पेशी वाढू लागतात आणि हळुहळू पसरतात. हा कर्करोग (Cancer) जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत तो आढळून येत नाही, त्यामुळे तो महिलांमध्ये आढळून येणाऱ्या गंभीर कर्करोगांपैकी एक ठरतो. हा एक सायलेंट किलर आहे. कारण पोट फुगणे, ओटीपोटात वेदना आणि सतत लघवीची इच्छा होणे यांसारख्या लक्षणांकडे मोठ्या संख्येने महिला दुर्लक्ष करतात. ओव्हरियन कर्करोगाची लक्षणे अनेकदा अस्पष्ट असतात आणि त्याकडे सहज दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे वेळीच निदान करणे कठीण होते. ते सहसा नंतरच्या टप्प्यातच लक्षात येतात, जेव्हा रोग आधीच वाढलेला असतो. त्याचे नेमके कारण अस्पष्ट असते, परंतु जोखीम घटकांमध्ये वय, अनुवंशिकता आणि हार्मोनल घटकांचा समावेश आहे. अनेक महिलांमध्ये जागरुकतेचा अभाव दिसून येतो आणि याबाबतील बरेच गैरसमज पसरलेले दिसतात. हे गैरसमज दूर करत कसलीच लाज न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घेण्यास महिलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमज नेमके कोणते आहेत या संदर्भात खारघर, नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्स, सल्लागार मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सलील पाटकर, यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते जाणून घेऊयात.
गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमज कोणते?
गैरसमज 1 : गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार करणे अशक्य आहे
वास्तविकता : गर्भाशयाच्या कर्करोगाचे रुग्णांचे निदान शेवटच्या टप्प्यात होते, ज्यामुळे गुंतागुत वाढु शकते. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात हा कर्करोग आढळल्यास तो बरा करणे शक्य आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगासाठी वेगवेगळे उपचार पर्याय देखील उपलब्ध आहेत. उपचार करणारे डॉक्टर तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवून त्यानुसार पुढील पाऊल उचलू शकतात .
गैरसमज 2 : गर्भाशयाचा कर्करोग केवळ वयोवृद्ध महिलांमध्येच दिसून येतो
वास्तविकता : गर्भाशयाचा कर्करोग हा वयस्कर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो, कारण रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये या कर्करोगाची शक्यता अधिक आहे. मात्र, गर्भाशयाचा कर्करोग हा कोणत्याही वयात होऊ शकतो. 30 ते 40 वयोगटातील तरुण महिलांना देखील या कर्करोगाचा तितकाच धोका आहे.
गैरसमज 3 : पॅप स्मीअर चाचणी गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यास मदत करतात
वास्तविकता: पॅप स्मीअर्स गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करत नाहीत आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका समजून घेण्यासाठी त्यांचा वापर केला जात नाही. गर्भाशयाच्या कर्करोगासाठी, सध्या महिलांसाठी कोणत्याही प्रभावी तपासण्या उपलब्ध नाहीत. तथापि, ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड आणि CA-125 रक्त चाचण्यांची ऑन्कोलॉजिस्टद्वारे शिफारस केली जाऊ शकते.
गैरसमज 4 : गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका फक्त कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनाच असतो
वास्तविकता: महिलांनो, हे समजून घ्या की गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असला तरी, बहुतेक गर्भाशयाच्या कर्करोगाच्या घटना या कौटुंबिक संबंध नसलेल्या महिलांमध्येही आढळून येतात. वय, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर आणि काही अनुवांशिक मार्करमुळे एखाद्या व्यक्तीला या कर्करोगाचा धोका अधिक असतो.
गेरसमज 5 : टॅल्कम पावडरचा वापर गर्भाशयाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो
वास्तविकता: असे मानले जाते की जेव्हा एखादी महिला जननेंद्रियाच्या क्षेत्रात टॅल्कम पावडर वापरते तेव्हा पावडर चे कण फॅलोपियन ट्यूबसह प्रजनन मार्गातून प्रवास करू शकतात आणि अंडाशयांपर्यंत पोहोचू शकतात.तिथे पोहोचल्यानंतर पावडरचे हे कण जळजळ निर्माण करू शकतात, ज्यामुळे कालांतराने गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
गैरसमज 6 : गर्भाशय काढून टाकणाऱ्या महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी असतो
वास्तविकता: गर्भाशय काढून टाकल्याने गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, परंतु तो दूर होत नाही. अंडाशय काढून टाकल्याने धोका आणखी कमी होतो, परंतु गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका होण्याची शक्यता ही काही प्रमाणात असते.
हे ही वाचा :