Kidney Problem : किडनीचा त्रास (Kidney Problem) हा गंभीर आजारांपैकी एक आहे. जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्याचे कार्य सुधारण्यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मूत्रपिंड आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. त्यामुळे किडनीशी संबंधित छोट्याशा समस्यांकडेही दुर्लक्ष करता येत नाही. किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थ टाळणं गरजेचं आहे. यामध्ये जास्त सोडियम असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, कार्बोनेटेड पेये आणि उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आहे. जीवनशैली (Lifestyle) आणि आहारात (Food) बदल करून किडनीचे आजार टाळता येऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.


लोणचे (Pickle)


किडनीच्या रुग्णांनी चुकूनही लोणच्याचं सेवन करू नये. याचं कारण म्हणजे लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तुम्ही किडनीचे रुग्ण असाल तर लोणच्यापासून अंतर ठेवा.


उच्च प्रथिने (High Protein)


प्रथिने आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहेत. पण, प्रोटीनचं जास्त सेवन केल्याने आपल्या किडनीला धोका पोहोचतो. जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनीवर दबाव येतो. बीन्स, मसूर आणि इतर उच्च प्रथिनयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणातच खा.


केळी (Banana)


केळ्यांमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळेच किडनीच्या रुग्णांनी केळ्याचे सेवन करू नये. त्याऐवजी तुम्ही अननस खाऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे किडनी व्यवस्थित काम करते.


बटाटा (Potato)


बटाट्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. बटाटे वापरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. तथापि, सर्व पोटॅशियम बाहेर येण्यास सक्षम नाही. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी जास्त बटाटे खाऊ नयेत.


कॅफिन


याशिवाय किडनीच्या रुग्णांनीही कॅफिनपासून दूर राहावे. शरीरातील कॅफीनचे प्रमाण जास्त असल्याने शरीर निर्जलीकरण होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याचाही धोका असतो. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा त्याचा किडनीवर दबाव पडतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं