Dancing Benefits: डान्स (Dance) करणं अनेकांना आवडतं. लग्नात, हळदीच्या कार्यक्रमात, पार्टीमध्ये डान्स करायला अनेकांना आवडतं. ग्रुप डान्स, सोलो डान्स असे डान्सचे प्रकार आहेत. रोज 30 मिनिट डान्स करणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. डान्स केल्यानं केवळ फॅट्स कमी होत नाहीत तर मानसिक ताण देखील कमी होतो. जाणून घेऊयात डान्स करण्याचे फायदे...
वजन होते कमी (Weight loss)
डान्स केल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात. विविध गाण्यावर जर तुम्ही डान्स केला तर तुमच्या कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होते. डान्स केल्याने हृदयाच्या संबंधित समस्या जाणवणार नाहीत. डान्स केल्याने हार्टचं पंपिंग व्यवस्थित होते. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या एका रिपोर्टनुसार, डान्समुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. डान्स केल्याने डिमेंशिया म्हणजे स्मृतिभ्रंश होत नाही. नृत्यातील डान्स स्टेप्स आणि वेगवेगळ्या हालचाली लक्षात ठेवून त्या केल्याने स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी डान्स रोज 30 मिनिट करावा.
जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल यांनी घेतलेल्या एका अॅक्टिव्हिटीमध्ये असे दिसून आले आहे की, टँगो डान्सिंग स्टाईल केल्याचा वृद्धांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. डान्स केल्याने वृद्धांना शरीरावर चांगले नियंत्रण ठेवता येते.
टेन्शन होतं गायब
नृत्यामुळे तणाव कमी होतो (stress relief) आणि हॅपी हार्मोन्स शरीरात निर्माण होतात. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला नृत्य करण्याचा सल्ला दिला जातो. डान्स ग्रुपमध्ये सामील झालेल्यांमध्ये तणाव कमी असतो, असं एका संशोधनात उघड झालं होतं. डान्स केल्यानं शरीरात उत्साह राहतो. परीक्षा, ऑफिस यांसारख्या गोष्टींचे टेन्शन तुम्हाला येत असेल तरी देखील तुम्ही डान्स करु शकता. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी डान्स करावा, असं अनेक जण म्हणतात.
डान्सचे प्रकार
डान्सचे विविध प्रकार आहेत. बॅलेडान्स, बॉलरूम, फोक डान्स हे डान्सचे प्रकार आहेत. पण व्यायाम म्हणून जर तुम्हाला डान्स करायचा असेल तर तुम्ही कोणतेही गाणे लावून घरात फ्री स्टाइल डान्स करु शकता. अनेक जण झुंबा वर्कआऊट देखील करतात. झुंबा हा विविध गाण्यांवर केला जाणारा कार्डिओ एक्सरसाइज प्रकार आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Health Tips: रात्री चुकूनही करु नका 'या' पदार्थांचे सेवन; झोप लागणार नाही