Health Tips : जगभरातील कित्येक लोक सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये अंड खाणे पसंत करतात. सुपर फूडमध्ये समाविष्ट असलेल्या अंड्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. दररोज अंडे खाल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात.


अमेरिकन तज्ज्ञ प्रोफेसर क्रिस्टोफर बलेसो यांच्या मते सकाळी दोन अंडी खल्ल्याने 12 ग्रॅम प्रथिने, तसेच व्हिटॅमिन ए, डी, बी, आयोडीनसुद्धा शरीराला मिळते. मग आपण जाणून घेऊया अंड्यांचा ब्रेकफास्टमध्ये समावेश केल्यास आरोग्यासाठी कसा फायदा होतो.


त्वचा तजेलदार राहते


ब्रेकफास्टमध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही.  त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी करतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते.


हाडांसाठी फायदेशीर


व्हिटॅमिन डीने भरलेल्या अंड्यात 20 मिलीग्राम फॉस्फरस आणि 45 मिलीग्राम कॅल्शिअम असतं. हे हाडे आणि दात यांना मजबूत बनवतं. दुसरीकडे, व्हिटॅमिन डी मुळे अंडं कॅल्शिअम शोषून घेण्याचे महत्वाचे कार्य करते.


VIDEO | अंडं शाकाहारी की मांसाहारी? अखेर उत्तर मिळालं!



नजरेसाठी उपयुक्त


संशोधनानुसार, अंड्यात ल्युटीन नावाचं अँटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळते. हे दृष्टी उत्तम ठेवण्यासाठी हे जबाबदार आहे. पण यांच्या अभावामुळे डोळ्याच्या टिश्यूमध्ये बदल होतो आणि दृष्टी कमी होऊ शकते.


त्वचा, केस आणि यकृत यांसाठी उत्कृष्ट


सुपर फूड अंड्यांमधील व्हिटॅमिन बी आणि प्रथिने केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाच्या भूमिका निभावतात. त्याच प्रकारे, जेवणात अंडी समाविष्ट केल्यास, यकृतातील विषारी घटक जलदगतीने सोडले जातात.


अंड हृदयविकाराचा धोका कमी करतं


अंड्यांच्या वापराविषयी अनेक गैरसमज सापडतात. परंतु संशोधनातून असे दिसून आले आहे की अंड्यांमध्ये असलेले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी हानिकारक नसते.


VIDEO | Special Report | चारा खाणारी शेळी जेव्हा अंडी खाते, इंदापुरातला 120 किलोचा रांगडा टायगर



(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)