Good Sweetener For Health : आपल्यातील बहुतेकजणांची दिवसाची सुरुवात सकाळच्या गोड (sweetener) चहासोबत होते. चहाला गोडी येण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. चहा बनवण्यासाठी साखरेशिवाय (sugar) काहीजण गुळ (jaggery), ब्राऊन शुगर (brown sugar) आणि मधाचा वापर करतात. यामुळे चहाला एक वेगळी गोडी येते. बहुतेकांना हे माहिती आहे की, साखर आरोग्यासाठी घातक आहे. याला पर्याय म्हणून गुळ (Jaggery), मध (Honey) आणि ब्राऊन शुगरचा (Brown Sugar) वापर करायला सुरूवात करतात. हे तिन्ही पदार्थ ऊसापासून तयार केली जातात. यातील गुळ प्रक्रिया केलेलं नसतं. यातील गुळात आर्यन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. पण हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? याचा आरोग्यावर काही वाईट परिणाम होतो का? यातील नेमकं सत्य काय आहे?  


कोणता गोड पदार्थ खाण्यासाठी फायदेशीर?


साखर (sugar), ब्राऊन शुगर (brown sugar), गुळ आणि मध यांपासून जवळपास एकसमान कॅलरीज मिळतात. पण याचा अतिरेक आरोग्याचं मोठे नुकसान करू शकते. यामुळे साखरेला पर्याय म्हणून गुळ आणि मधाकडे वळत असाल, तर हे चांगलं नाही. या सगळ्यांमध्ये कॅलरीजचं प्रमाण भरपूर असतं. मात्र, गुळ आणि मधामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक उपलब्ध असतात. पण मर्यादेत राहूनचं गोड पदार्थ खायला हवं. अन्यथा आरोग्याला फायदे कमी नुकसान जास्त होऊ शकतं.


साखरेला गुळ पर्याय ठरू शकतं का? (Sugar Or Jaggery)


गुळाच्या ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी कमी असते. त्यामुळे गुळाचं सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. या इंडेक्समुळे अन्नघटकातील साखरेची पातळी कळते. गुळ हे मधुमेही रूग्णांसाठी प्रमाणात घेतलं, तर साखरेला चांगला पर्याय ठरू शकतं. गुळापासन आर्यन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारख्या पोषक घटक मिळतात. हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आपल्या घरात हिवाळ्याच्या दिवसात गुळ खायचा सल्ला दिला जातो. कारण त्यातील पोषक घटक आहे. तसेच शरीरात उर्जा टिकून राहते. प्रमाणाबाहेर गुळ खाण्याची सवय लागली, तर आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचं आहे. यासाठी तुमच्या  डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.  


(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. )