Cancer: कर्करोगाचे नाव काढताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा होतो. कारण हा एक असा आजार आहे, जो शक्यतो लवकर बरा होत नाही. अलीकडेच माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांनी त्यांच्या पत्नीच्या स्टेज 4 कॅन्सर रिकव्हरीबाबत मोठे अपडेट दिले. याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या पत्नीने कॅन्सरवर कशी मात केली, तसेच त्यांच्या डाएट बद्दल सांगितले. मात्र, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक तसेच 260 हून अधिक कर्करोग तज्ज्ञांनी मिळून नवज्योतसिंह सिद्धूच्या या दाव्याचे खंडन केले. जाणून घ्या..


पत्नीने केली कॅन्सरवर मात, सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली


सिद्धू यांनी गुरुवारी अमृतसरमधील त्यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू आता कर्करोगमुक्त आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, काटेकोर आहारामुळे त्यांच्या पत्नीला कर्करोगातून बरे होण्यास मदत झाली. ते म्हणाले की साखर आणि कार्बोहायड्रेट्सची कमतरता कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते. यासोबतच त्यांनी फास्टींगचे महत्त्वही सांगितले. हे सांगताना मात्र सिद्धू यांच्याकडे याचा कोणताही पुरावा नव्हता.


पत्नीचा डाएट प्लॅन सांगितला..


पत्नीच्या कॅन्सरबाबत माहिती देताना सिद्धू म्हणाले की, त्यांची पत्नी नवज्योत कौर, ज्यांना कर्करोग झाला होता, त्यांनी लिंबू पाणी, कच्ची हळद आणि सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन केले. अर्ध्या तासानंतर त्याने 10-12 कडुनिंबाची पाने आणि तुळस खाल्ली. याशिवाय भोपळा, डाळिंब, गाजर, आवळा, बीटरूट आणि अक्रोड यापासून बनवलेले ज्यूसही त्यांच्या आहाराचा भाग होता. त्यांनी पुढे सांगितले की त्यांची पत्नी फक्त PH पातळी 7 असलेले पाणी सेवन करायच्या






262 ऑन्कोलॉजिस्टनी सिद्धूंचे दावे फेटाळले


सिद्धू यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 262 कर्करोगतज्ज्ञांनी लोकांना उपचारात उशीर न करण्याचा, तसेच योग्य उपचार निवडण्याचा सल्ला दिला. या डॉक्टरांचे पत्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. ती पोस्ट आम्ही इथे शेअर करत आहोत. या पोस्टवर 409900 व्ह्यूज आहेत.






हळद किंवा कडुलिंबाची पाने खाल्ल्याने कर्करोग बरा होतो? डॉक्टर म्हणतात...


कच्ची हळद किंवा कडुलिंबाची पाने खाल्ल्याने कर्करोग बरा होतो या दाव्याला कोणताही पुरावा नाही, असे या पत्रात कर्करोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माजी क्रिकेटपटूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे, ज्यामध्ये ते आपल्या पत्नीच्या स्तनाच्या कर्करोगाच्या उपचाराबद्दल बोलत आहे. व्हिडीओचे काही भाग सूचित करतात की 'दुग्धजन्य पदार्थ आणि साखर न खाल्ल्याने कॅन्सर कमी होतो, तसेच हळद आणि कडुलिंबाचे सेवन केल्याने त्यांचा कर्करोग बरा झाला. या विधानांचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नाही.


हेही वाचा>>>


Cancer: अवघ्या 40-50 दिवसांत स्टेज 4 कॅन्सरवर मात? नवज्योत सिंह सिद्धूच्या पत्नीची कमाल, सांगितला संपूर्ण Diet, तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )