Health: काही जणांना नाकात बोट घालण्याची खूप सवय असते. कळत-नकळत अशा लोकांची हाताची बोटं नाकात जातात. नाकात बोट घालण्याची ही सवय लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच दिसून येते. पण मंडळींनो.. खरं तर, ही सवय खूप घाणेरडी आहे आणि जे करतात ते त्यांची ही सवय सहजा सहजी सुटत नाही, तुम्हाला माहितीय का? असे केल्याने आरोग्याला किती गंभीर नुकसान होऊ शकते.
वारंवार नाकात बोट घालणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात माहितीय?
वैद्यकीय भाषेत पाहिलं तर, वारंवार नाकात बोट घालणाऱ्या व्यक्तीला Rhinotillexomania म्हणतात. काही हे उघडपणे करतात तर काही गुप्तपणे करतात. अनेकवेळा असे घडते, जर आपण एखाद्याला असे करताना पाहिले तर ती व्यक्ती लाजते आणि इकडे तिकडे पाहू लागते. तुम्हाला माहितीय का? वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की, नाकात बोट घातल्याने काही जंतू नाकाच्या पोकळीत प्रवेश करतात, ज्यामुळे अल्झायमर रोग होण्याची प्रक्रिया सुरू होते.
अभ्यासात काय म्हटलंय?
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक वारंवार नाकात बोट घालतात, त्यांना अल्झायमर रोग होण्याची शक्यता जास्त असते. काही संशोधनांचा आढावा घेऊन हा अभ्यास करण्यात आला आहे. वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की, तुमच्या नाकात बोट गेल्याने काही जंतू शरीरात प्रवेश करू शकतात, जे मेंदूला बीटा-मायलॉइड तयार करण्यास चालना देतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, AA हे बीटा-मायलॉइड प्रोग्रेसिव्ह डिमेंशियाचे प्रमुख कारण आहे, जे अल्झायमर रोगाचे वैशिष्ट्य आहे. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की अल्झायमर रोगातील न्यूरोइनफ्लॅमेशन हे Olfactory System च्या माध्यमातून मेंदूमध्ये प्रवेश करतात. तर रिपोर्ट सूचित करतो की, Olfactory System रोगजनकांच्या प्रवेशासाठी एक मार्ग दर्शवते, त्याचा मेंदूशी थेट संबंध दर्शवितो
अमेरिकेत अल्झायमरची समस्या
मेयो क्लिनिकच्या मते, युनायटेड स्टेट्समध्ये अंदाजे 6.5 दशलक्ष लोक 65 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अल्झायमर रोग आहे, यापैकी 70% पेक्षा जास्त प्रकरणे 75 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये आढळतात. हा मेंदूचा विकार प्रोग्रेसिव ब्रेन डिसऑर्डर डिमेंशियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.
जागतिक स्तरावर, असे मानले जाते की, स्मृतिभ्रंश असलेल्या 55 दशलक्ष लोकांपैकी 70% अल्झायमरने ग्रस्त आहेत. यूएसएच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगने सुचवले आहे की, हे वय-संबंधित मेंदूतील बदल, अनुवांशिक पूर्वस्थिती, पर्यावरणीय घटक आणि जीवनशैली निवडींच्या संयोजनामुळे होऊ शकते.
तर वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे अल्झायमर रोग होऊ शकतो. नाकातील खाज सुटण्याबाबत संशोधकांनी सांगितले की, कोरडा कफ काढून टाकल्यानेही श्वास घेणे सोपे होते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, नाकाची दररोज स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे
हेही वाचा>>>
Cancer: अवघ्या 40-50 दिवसांत स्टेज 4 कॅन्सरवर मात? नवज्योत सिंह सिद्धूच्या पत्नीची कमाल, सांगितला संपूर्ण Diet, तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )