Health : छत्रपती शिवाजी महाराज की जय..! असं म्हणताच अंगात एक प्रकारचा उत्साह आणि बळ संचारते, अनेकांची प्रेरणा असलेले शिवाजी महाराज हे एक योद्धा, जनतेचा राजा होते, शिवाजी महाराज त्यांच्या शौर्य, रणनीती आणि प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांनी नेहमी स्वराज्य आणि मराठा वारसा यावर लक्ष केंद्रित केले. ते 96 मराठा कुळांचे वंशज होते, ज्यांना 'क्षत्रिय' किंवा शूर सेनानी म्हणून ओळखले जाते, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा, त्यांच्या पराक्रमांचे किस्से आपण नेहमीत ऐकत आलोत. पण तुम्हाला माहित आहे का? आहार आणि युद्ध यांच्यातील थेट संबंध ज्यांनी ओळखला, अशा शिवाजी महाराजांचा आहार काय होता? अनेकांना असा प्रश्न आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी की मांसाहारी होते? इतिहासकार काय सांगतात जाणून घ्या..


 



शिवाजी महाराज आपल्या आहाराबाबत काटेकोर आणि शिस्तप्रिय


छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आहाराबाबत अगदी काटेकोर आणि शिस्तप्रिय असल्याचा उल्लेख इतिहासात आहे. शूर आणि हुशार अशा शिवाजी महाराजांनी आहार आणि युद्ध यांच्यातील थेट संबंध आधीच ओळखला होता. इतिहासातील काही संदर्भांनुसार महाराजांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, दूध, लोणी दही तूपाचा वापर होत होता. सैन्यासाठीही या गोष्टींचा वापर त्या काळात केला जात असल्याचे म्हटले जाते. तर काही जण म्हणतात शिवाजी महाराज हे मांसाहारी होते. नेमकं काय सत्य आहे? इतिहासकार काय सांगतात? जाणून घ्या...



इतिहासकार काय म्हणतात? 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहाराविषयी इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. काही संदर्भ पाहिले असता महाराजांच्या आहाराच्या सवयी स्पष्ट असल्याचे सांगत त्यांनी काही संदर्भही दिले. इंद्रजित यांच्या म्हणण्यानुसार पहिला संदर्भ म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत सापडले, त्या प्रसंगी शिवाजी महाराज तिथं सुकामेवा खात होते आणि एक वेळ जेवत होते असा उल्लेख आहे. याचाच अर्थ महाराज आपल्या आहाराविषयी नेहमी शिस्तप्रिय असे.


 


शिवाजी महाराज मांसाहारी होते?


छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाराही ही बाब, याविषयी आजही अनेक मतमतांतरं आहेत. पण, इतिहासातील आणखी काही संदर्भांचा आढावा घेतल्यास शिवाजी महाराज हे मराठा होते. म्हणजे त्यांच्या घरात मांसाहार चालत होता असेही सांगण्यात येते. फक्त शिवाजी महाराज नव्हे तर, संभाजी महाराजही मांसाहारी होते, त्यांच्यावर याच आहारातूनच विषप्रयोग झाल्याचेही संदर्भ आहेत. तर छत्रपती घराण्याच्या परंपरा पाहिल्या असता, तर भोसले कुळाचं कुलदैवत आहे तुळजापूरची भवानी देवी. सर्व ठिकाणी या भवानी देवीला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो किंवा देवीला बकऱ्याचा बळी आजही दिला जातो. याचाच अर्थ असा की आजचे जे छत्रपती आहेत मग ते सातारचे असो किंवा कोल्हापूरचे असो या दोन्ही घराण्यांमध्ये आजही सरसकट मांसाहार सुरू आहे. 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


 


 


हेही वाचा>>>


Weight Loss: काय सांगता..! नाश्त्याला पोहे खाऊन 5 किलो वजन कमी होईल? आहारतज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या