Health : ऑफिसमध्ये बसून काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि तासन्-तास बसून वजनही झपाट्याने वाढतंय... अशात काय करावं? असा प्रश्न अनेकदा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना पडतो. ऑफिसचं कामही तितकंच महत्त्वाचं आणि वजन नियंत्रणात कसं आणायचं? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आम्ही तुम्हाला खास आणि महत्त्वाची माहिती देणार आहोत. जाणून घ्या..


 


वाढणारे वजन गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते


ऑफिसला जाणाऱ्या लोकांमध्ये वजन वाढणे किंवा पोटाची चरबी ही समस्या तशी सामान्य झाली आहे. ऑफिसचे काम संपवून घरी जाण्याच्या घाईत लोक ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून तासन् तास घालवतात. अशा परिस्थितीत सतत वाढणारे वजन अनेक गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. ऑफिसमध्ये काम करताना वजन वाढण्याची कारणे असू शकतात, जी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून नियंत्रित किंवा कमी करू शकता. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर ऑफिसमध्ये वजन वाढण्याची कारणे आणि ते कमी करण्याच्या टिप्स याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.


 


ऑफिसमध्ये बसल्याने वजन का वाढते? याची कारणं काय?


ऑफिसमध्ये 9 ते 6 या वेळेत काम करताना बहुतांश लोक एकाच जागी बसून राहतात, त्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅलरीज कमी प्रमाणात जळतात. शरीरात कमी कॅलरी बर्न झाल्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. इतकंच नाही तर ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्ही अनेकदा काही ना काही खात किंवा पीत राहतो, ज्यामुळे वजन वाढू शकतं, कारण त्यामुळे चयापचय मंदावतो. जास्त वेळ एकाच जागी बसून राहण्याच्या सवयीमुळे कॅलरीज जळण्याऐवजी शरीरात जमा होऊ लागतात आणि त्याचे फॅटमध्ये रूपांतर होते. 9-5 जॉबमध्ये सतत बसल्यामुळे लोक कॅलरी बर्न करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते. त्याच वेळी, 8-9 तासांच्या शिफ्टमध्ये काम केल्यानंतर, बऱ्याच वेळा माणूस इतका थकतो की त्याला इच्छा असूनही त्याच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. अशा परिस्थितीत लठ्ठपणाची समस्या सतत वाढू लागते.


 






ऑफिस बसून वाढलेले वजन कसे रोखायचे?


 घरातून बाहेर पडण्यापूर्वी नाश्ता करायला विसरू नका. नाश्ता करून ऑफिसला गेल्याने तुमची भूक कमी होते आणि तुम्ही दुपारच्या जेवणापूर्वी म्हणजे 11 किंवा 12 वाजेपर्यंत कोणताही नाश्ता खात नाही, ज्यामुळे वजन वाढते.


बरेच लोक ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर चहा किंवा कॉफी आणि धूम्रपान करून आपल्या कामाची सुरुवात करतात, परंतु तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही नारळपाणी, शरबत किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही फळ खाऊन कामाला सुरुवात करावी. असे केल्याने नंतर येणारी झोप, सुस्ती आणि सूज येणे या समस्या कमी होऊ शकतात.


संध्याकाळी काम करताना तुम्हाला थोडी भूक लागते, ती तृप्त करण्यासाठी तुम्ही 4 ते 6 या वेळेत शेंगदाणे, आंबा, केळी किंवा ड्रायफ्रुट्स असा सकस नाश्ता खावा. असे केल्याने, तुम्ही रात्री हलके अन्न खा, जे आरामदायी झोप आणि निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे.


ऑफिसमध्ये काम करताना वजन वाढू नये म्हणून एका जागी जास्त वेळ बसू नका आणि शक्य तितके चालण्याचा प्रयत्न करा.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Health : उष्णतेच्या लाटेनं वाढवलं टेन्शन! सावधान मंडळी.. 'या' 7 आजारांचा धोका वाढतोय, लक्षणं जाणून घ्या