Health: देशासह जगभरात गेल्या काही वर्षांत कॅन्सरशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये धक्कादायक बाब अशी की, तरुण वयातच लोक कॅन्सरला बळी पडताना दिसतायत. कर्करोगाचा धोका हा स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसून आला आहे, तोही धूम्रपान किंवा तंबाखूसारख्या व्यसनांच्या आहारी न गेलेल्या लोकांमध्ये. या कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारामागे काय कारण आहे? हे समजणे लोकांना कठीण होत आहे. त्याच वेळी, तज्ज्ञांनी मात्र 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना कर्करोगाची घटना उघड केली आहे.


...त्यामुळे 50 वर्षांखालील कर्करोगाचा धोका


एका अहवालानुसार, 50 वर्षांपेक्षा कमी वय असले तरी, लोकांना कर्करोग का होतो, हे यूकेच्या टॉप कॅन्सर डॉक्टरांनी सांगितले आहे. धूम्रपान किंवा तंबाखूची सवय नसली तरी आहार हे कर्करोगाचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टर म्हणतात की, कर्करोगाच्या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये 25% वाढ झाली आहे. 2023 च्या आंतरराष्ट्रीय विश्लेषणानुसार, गेल्या 30 वर्षांमध्ये जगभरात तरुणांचे निदान 80% आणि यूकेमध्ये 25% वाढले आहे.


लहान वयात कॅन्सर होण्याचे हे कारण, तज्ज्ञ सांगतात..


कॅन्सरचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे असले, तरी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्याने कर्करोग होऊ शकतो, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. खरं तर, ब्रिटीश कर्करोग तज्ज्ञांच्या मते, जंक फूड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे देखील कर्करोग होऊ शकतो. कॅन्सर रिसर्च यूकेचे ऑन्कोलॉजिस्ट आणि मुख्य फिजिशियन प्रोफेसर चार्ल्स स्वांटन यांनी ही माहिती दिली आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक कमी फायबर आणि जास्त साखरचे सेवन करतात, त्यांना देखील कर्करोगाचा धोका वाढतो.


खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरुणाईमध्ये कॅन्सर होतो


नॅशविल येथील वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील आतड्याच्या कर्करोगाचे डॉक्टर कॅथी इंग्ज यांनी सांगितले की, खराब आहार आणि जीवनशैलीमुळे अनेक तरुण कर्करोगाच्या रुग्णांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेह यांसारख्या समस्या देखील असतात.


कर्करोग कसा टाळावा?



  • डॉक्टरांच्या मते, जीवनशैलीत चांगला बदल केल्यानेच तुम्ही आजारांपासून मुक्त राहू शकता.

  • तुम्ही दिवसभर जे खाता किंवा पिता त्याचा तुमच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.

  • चुकीचे अन्न खाल्ल्याने अनेक रोगांना तुम्ही स्वतः आमंत्रण देऊ शकता.

  • अल्कोहोल, धूम्रपान, तंबाखू यासारख्या सवयी सोडण्याबरोबरच, तुम्हाला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आणि जंक फूडचे सेवन करणे देखील बंद करावे लागेल.

  • तुम्हाला पिझ्झा, बर्गर, चाऊमीन, मोमोज आणि पॅकेट चिप्स किंवा दोन मिनिटांत तयार करता येणारे खाद्यपदार्थ यासारखे जंक फूड घेणे बंद करावे लागेल.

  • अशा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे केवळ पोटाचा कर्करोगच नाही तर इतर प्रकारचे कर्करोगही होऊ शकतात.


हेही वाचा>>>


Health: चहासोबत सिगारेट ओढण्याची सवय चांगलीच पडेल महागात! हृदयविकार, कर्करोगाचा धोका आणि बरंच काही...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )