Fitness Diet Plan : वजन कमी करायचे असेल तक लोक डाएट करण्याचा सल्ला देतात. पण डाएट म्हणजे जेवण वगळणे नाही. डाएटमध्ये पौष्टिक अन्नाचा समावेश हवा. डाएट करताना भूक लागणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी. तसेच पुरेशी झोप घेणेदेखील आवश्यक आहे. याशिवाय दररोज एक तास व्यायाम करावा.
तंदुरुस्त राहण्यासाठी हा डाएट प्लॅन करा फॉलो
- सकाळी 6 ते 7 दरम्यान मेथीचे पाणी प्यावे.
- सकाळी साडे तासच्या दरम्यान बदाम आणि अक्रोड खावे.
- सकाळी साडेआठ वाजता सकस नाश्ता करावा.
- सकाळी साडेअकरा वाजता एखादे फळ किंवा सॅलड खावे.
- त्यानंतर दुपारी 12 वाजता ग्रीन टी प्यावा.
- दुपारी एक वाजता जेवण करावे.
- त्यानंतर दुपारी दोन वाजता परत ग्रीन टी प्यावा.
- दुपारी चार वाजता नाश्ता करावा.
- संध्याकाळी पाच वाजता लिंबू पाणी प्यावे.
- संध्याकाळी सात वाजता हलका आहार करावा.
- जेवणानंतर दोन तासांनी झोपावे.
सात ते आठ वाजता करा जेवण
- वजन कमी करायचं असेल तर रात्रीचे जेवणं सात ते आठ या दरम्यान करावे. यामुळे पचन चांगले होते. त्यामुळे वजन देखील कमी होते.
- दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते.
शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या