Health: जगभरात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer in Men) वेगाने वाढताना दिसत आहे. दरवर्षी सामान्यपणे २ लाख नवीन स्तनाच्या कर्करोग रुग्णांचे निदान होते. पण केवळ महिलांमध्येच नव्हे तर पुरुषांमध्येही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो असे तज्ञ सांगतात. ४० ते ७० वयोगटातील अनेक पुरुषांवर स्तनाच्या कर्करोगाचे परिणाम होतो. भारतात याबाबत कोणतीही आकडेवारी नसली तरी अमेरिकेत दरवर्षी साधारणत: २८०० नवीन प्रकरणांचे निदान केले जाते. पुरुषांच्या स्तनामध्ये जास्त चरबी नसते त्यामुळे कर्करोग फुफ्फुस, यकृत, हाडे आणि मेंदूमध्ये वेगाने पसरतो.
काय आहेत लक्षणं?
पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग दूर्मिळ कर्करोग असून जो पुरुषांच्या ऊतींमधील पेशींच्या वाढीपासून सुरु होतो. स्तनाचा कर्करोग महिलांमध्ये खूप सामान्य असला तरी पुरुषांनाही हा कर्करोग होतो. बहूतेकवेळा वृध्द पुरुषांमध्ये हा रोग अधिक दिसतो.असं तज्ञांचं म्हणणं आहे.
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची दिसणाऱ्या लक्षणांमध्ये छातीवर वेदनारहित ढेकूळ किंवा त्वचा जाड होणं, स्तनाग्रहात बदल, त्वचेचा रंग किंवा स्केलिंग बदलणे किंवा स्तनाग्रहातून रक्तस्राव होणे अशा लक्षणांचा समावेश आहे.
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाआधी काय होतात बदल?
पुरुषांना स्तनाचा कर्करोग नक्की कशामुळे होतो हे तितकेसे स्पष्ट नसले तरी दुधाच्या नलिकांमध्ये सुरु होणारा कर्करोग ज्याला डक्टल कार्सिनोमा म्हणतात. यासाह दूध उत्पादक ग्रंथींमध्ये सुरु होणारा लोब्युलर कार्सिनोमा हे काही दूर्मिळ कर्करोग पुरुषांमध्ये दिसून येतात. यामध्ये उतीला दाह, जळजळ अशा स्वरूपाचा त्रास संभवतो.
६० वर्षांवरील पुरुषांना कर्करोगाचा धोका
वयानुसार पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. जगभरात निदान करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कर्करोग झालेल्या रुग्णाचं वय हे ५० ते ६० वर्षांच्या पुढंचं दिसून आल्याचं डॉक्टर सांगतात. कौटुंबिक इतिहास असेल तर पुरुषांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता बळावते.तसेच लठ्ठपणा हेदेखील स्तनाच्या कर्करोगाचं एक कारण आहे.यासाठी लक्षणं दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मॅमोग्राफी हा स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा:
Women Health: स्तनाच्या कर्करोगात बदलतो स्तनाचा आकार, यावर काय आहेत उपचार?