Rava Health Benefits : रवा (Rawa) हा अनेक पौष्टिक तत्वांनी समृद्ध असतो, त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात, जे अनेक आजारांशी लढण्यासाठी आपल्या शरीराला (Health) ऊर्जा देतात. सकाळची न्याहारी (Breakfast) ते रात्रीचे जेवण, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे रव्याचा आहारात समावेश करू शकता. रवा अनेक पदार्थांमध्ये मुख्य घटक म्हणून वापरला जातो. रवा प्रामुख्याने रोजच्या आहारातील नाश्त्याचा पदार्थ आहे. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात रवा असतोच. रवा गव्हापासून बनविला जातो.


रवा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त पदार्थ आहे. रवा मूत्रपिंडाची कार्यक्षमता सुधारण्यास उपयोगी आहे. रव्याचा समावेश आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांच्या साहाय्याने करता येतो. उपमा, रवा इडली, डोसा, उत्तपा, शिरा, लाडू असे विविध पौष्टिक पदार्थ रव्यापासून बनवता येतात. धावपळीच्या आयुष्यात रवा एक पौषक अन्न पदार्थ म्हणून कार्य करतो.


रव्याचे पौष्टिक तत्व 


रवा हा अनेक पौष्टिक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. रवा प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांचा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन अ आणि डी भरपूर प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक तत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.  हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 


रव्याचे आरोग्यासाठी फायदे 


मधुमेहावर नियंत्रण 




रवा मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे. याचं कारण म्हणजे रवा मॅग्नेशियम आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. जे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करतात.


हृदयाचे आरोग्य




आहारात रव्याचा वापर केल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत कार्य करण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टळतो. रव्यात आयर्नची भरपूर मात्रा आढळल्यामुळे हे शरीरात रक्ताची कमी पूर्ण होते.


वजन नियंत्रण 




रव्यामध्ये मुख्य म्हणजे फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल नसतं त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. रव्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे अन्न पचण्यास जास्त वेळ लागत नाही.


हाडे मजबूत होण्यास मदत 



रव्याच्या नियमित सेवनानं हाडांचे आरोग्य सुधारतं. रवा हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करते. हाडे आणि सांध्यांच्या मजबूतीसाठी रव्याचे पदार्थ खाणं फायदेशीर ठरते.


पचनक्रिया नियंत्रण 


फायबरने समृद्ध असलेल्या रव्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील