Omicron Variant : भारतासह जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घ्या ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे. 


जाणून घ्या ओमायक्रॉनपासून बचाव करण्याचे उपाय 
हात वारंवार स्वच्छ करा : कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात वारंवार स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. तसेच घराबाहेर असल्यास सॅनिटायझरचा वापर करावा.


घराला हवेशीर ठेवा :
घरातीत दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. यामुळे 


योग्य मास्कचा वापर करावा :
संपूर्ण तोंड झाकले जाईल असाच मास्क वापरावा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे.


सुरक्षित अंतर ठेवा :
कोरोनाकाळात सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी गर्दीत जाणे टाळावे.  


व्हिटॅमिन सी आणि झिंक : 
व्हिटॅमिन सी आणि झिंक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यासाठी तुम्ही लसूण, आले, गरम मसाला, हळद, मध, तुळस, संत्री, लिंबू इत्यादींचे सेवन करू शकता.


जास्तीत जास्त पाणी प्या :
पाणी सर्व प्रकारच्या रोगांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. त्याच वेळी, ओमायक्रॉन टाळण्यासाठी अधिक पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. अधिक पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Onion Peel Benefits : कांद्याची सालं कचरा म्हणून फेकून देताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे फायदे..


Brain Food : कोरोनातून बरे झाल्यानंतर मेंदूला बनवा निरोगी, ‘या’ 5 गोष्टींचा करा आहारात समावेश!


Romantic Destination : ‘व्हॅलेंटाईन डे’ला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘ही’ ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha