Child Care Tips : लहान मुलांचं (Kids) आरोग्य (Health) जपण्याची जबाबदारी पालकांवर असते. मुलांच्या वागण्याकडे त्यांच्या सवयीकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. जर तुमचं मूल दर काही मिनिटांनी वारंवार लघवी करत असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच सावध व्हा, नाहीतर याचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 


लहान मुलांच्या 'या' सवयीकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात


तुमच्या मुलालाही वारंवार लघवी होत असेल, तर वेळीच सावध व्हा. सर्वात आधी मुलाला लघवी करताना वेदना होत आहेत का ते विचारा. यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी स्पष्ट होतील. जर मुलाला लघवी करताना वेदना होत असेल तर, हे आरोग्यासंबंधित समस्यांचं लक्षण असू शकतं.


लहान मुलांना वारंवार लघवी होतेय?


लहान मुलांना वारंवार लघवी होत असेल तर, अनेकदा पालक याला युरिन इन्फेक्शन समजतात आणि आपल्या मुलाची लघवीची तपासणी करतात. पण, अहवालात काहीही समोर येत नाही आणि युरिन इन्फेक्शनची कोणतीही लक्षणेही आढळत नाहीत. अशा स्थितीत मुलाला वारंवार लघवी होते पण, कारण समोर न आल्याने पालकांची चिंता वाढते.


यामागचं नेमकं कारण काय?


जर तुमच्या मुलाला वारंवार लघवीची होत असेल, तर तुमचं मूल दिवसभर काय पीत आहे ते पाहा. पेप्सी, कोला असे कार्बोनेटेड ड्रिंक्स, चहा आणि कॉफी किंवा जास्त कॅलरीयुक्त पेये यामुळे तुमच्या मुलास वारंवार लघवी होऊ शकते. या ड्रिंक्समुळे मूत्राशयासंबंधित समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते. ही समस्या फक्त लहान मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्ये आणि विशेषत: महिलांमध्ये दिसून येते.


यावर उपाय काय?


कार्बोनेटेड किंवा फिजी ड्रिंक्सऐवजी लहान मुलांना पाणी आणि ताज्या फळांचा रस पिण्याची सवय लावा. हे मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल. शिवाय यामुळे वारंवार लघवीच्या समस्येपासूनही सुटका होईल. मुलांच्या आहारात बदल केल्यावर तुम्हाला स्पष्ट फरक दिसून येईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coronavirus : कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटपासून लहान मुलांचं संरक्षण कसं कराल? वृद्धांनाही धोका जास्त; वाचा सविस्तर