Food And Diet For Fast Recovery In Corona : भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट वेगाने पसरत आहे. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनानंतर शरीर खूपच कमकुवत होते. त्यामुळे चांगला आहार घेणे गरजेचे आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 


भरपूर फायबर - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी आरोग्यदायी आहार घेणे महत्त्वाचे आहे. नाश्त्यामध्ये फायबर युक्त आहाराचा समावेश करायला हवा. फायबर, व्हिटॅमिन-बी आणि कार्ब्स असणाऱ्या पदार्थांचे सेवन करायला हवे. नाश्त्यात अंडी देखील खाऊ शकता.


दुपारी खावी खिचडी - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात खिचडी खायला हवी. खिचडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञ खिचडीला सुपरफूडही म्हणतात. 


भरपूर पाणी प्या- हिवाळ्यात लोक खूप कमी पाणी पितात, पण जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्ही भरपूर पाणी प्यावे. कोरोनाकाळात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे.


सुका मेवा - जेवणादरम्यान सुका मेवा खायला हवा. ड्रायफ्रुट्समध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आणि पोषक घटक असतात. यामुळे अशक्तपणादेखील दूर होतो. 


फळे आणि भाज्या - पपई, सफरचंद यांसारखी फळे खाऊ शकता. याशिवाय हिरव्या भाज्या आणि क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या 


Corona Treatment : कोरोना व्हायरसच्या आजारात कोणती औषधं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत ? WHO ने जाहीर केल्या गाईडलाईन्स


Corona Treatment : कोरोना व्हायरसच्या आजारात कोणती औषधं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत ? WHO ने जाहीर केल्या गाईडलाईन्स


Covid-19 : मास्कच्या वापरात निष्काळजीपणा करताय? तर मग सावधान! जाणून घ्या मास्क वापरण्याचा योग्य मार्ग