पनीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की ते त्याचे जास्त सेवन केले पाहिजे. पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. आज आम्ही याविषयीच आपल्याला सांगणार आहोत.
जर आपल्याला आपले हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करायचे असेल तर पनीरचे सेवन कमी करा. पनीरचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. सोबतचं हृदयरोग होऊ शकतो.
Bird Flu India 2021 | सध्याच्या परिस्थितीत पोल्ट्री उत्पादनं खरेदी, सेवन करणं सुरक्षित आहे का?
पनीरमध्ये मीठ असल्यामुळे त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. परिणामी पनीर जास्त प्रमाणात घेतल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो. ज्यांना उच्च रक्तदाब समस्या आहे त्यांनी पनीर खाणे टाळावे.
वजनाबाबत जास्त जागरूक कोण? स्त्रिया की पुरुष? तुमचाही अंदाज चुकणार
ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे, त्यांनी कमीतकमी पनीर खावे. खायचे असेल तर ते रात्री खाऊ नये. अन्यथा, आम्लपित्त आणि पोटामध्ये गडबड होण्याची समस्या होऊ शकते.
Health Tips : ब्रेकफास्ट टाळण्यापूर्वी हे नक्की वाचा; कारण....
पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. परंतु, शरीरात जास्त प्रमाणात प्रोटीनमुळे अतिसार होऊ शकतो.
कच्चा पनीर खाणे देखील बर्याच लोकांना आवडते. परंतु, ही चांगली सवय नाही. वास्तविक, कच्चा पनीर खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो.