Health News : दुकानदार कोंबडी जास्त काळ टिकवण्यासाठी ऑक्सिटॉसिनचे इंजेक्शन देत असतात. म्हणूनच चिकन जास्त खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चिकन खाल्ल्याने पुरुष आणि महिलांमधील प्रजनन क्रिया विस्कळीत होण्याची भीती आहे.
जास्त चिकन खाणं का टाळलं पाहिजे?
ज्याठिकाणी जणावरं विक्रीसाठी असतात त्याठिकाणी श्वास घेणेही मुश्किल होऊन जाते. त्याठिकाणी जणावरांना फिरण्यासाठीही जागा नसते. तसेच जणावरं देखील वेगवेगळ्या आजारांना बळी पडलेले असतात.
महिलांमधील प्रजननाची समस्या - ज्या महिला जास्त चिकन खातात त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. जास्त चिकन खाल्ल्यामुळे शरीरातील ऑक्सिटॉसिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे महिलांमधील डीएनए आणि हार्मोण असंतुलित होतात. ज्यामुळे प्रजननाची समस्या निर्माण होते.
पुरुषांमधील समस्या - चिकन खाल्ल्याने पुरुषांमध्येही समस्या निर्माण होतात. अतीप्रमाणात चिकन खाल्ल्याने त्यांच्यातील शुक्राणू कमी होतात.
यावरील उपाय - शरीरात होणाऱ्या या आजारांना थांबवण्यासाठी चिकन जास्त खाणे टाळले पाहिजे. त्याऐवजी बकरीचे मटण, मासे खायला हवेत. आणि जे लोकं चिकन खाण्यावर ताबा मिळवू शकत नाहीत त्यांनी ऑर्गेनिक पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन चिकनची खरेदी करायला हवी.