Eating Black Aapple : आपल्या सगळ्यांना लाल सफरचंदाबद्दल माहिती आहे आणि बहुतेकांनी खाल्लंही असणार. यासाठी अनेकवेळा बाजारातून सफरचंदाची खरेदीही केली असणार. हे झालं रेग्युलर सफरचंदाबद्दल... परंतु तुम्ही कधी काळ्या सफरचंदाबद्दल ऐकलं आहे का ? काळे सफरचंद (Black Aapple) दिसायला खूप आकर्षक असतात. तसेच, या काळ्या सफरचंदाची चवही अत्यंत चांगली असती. पण हे सफरचंद बाजारात सहज उपलब्ध होत नसतात. या सफरचंदाला इंग्रजीमध्ये डायमंड अॅपल म्हटलं जातं. हे सफरचंदाला एकदम काळ्या हिऱ्यासारखी चमक असल्याचं दिसून येते. या सफरचंदाची प्रत्येक ठिकाणी शेती करता येत नाही. हे फळ विशिष्ट भूप्रदेशातचं घेतलं जातं.
या सफरचंदाची शेती कुठं केली जाते?
काळ्या सफरचंदाची शेती करण्यासाठी अत्यंत थंड वातारण लागतं. या सफरचंदाची शेती भूतान आणि तिबेटसारख्या देशातील परिसरात आढळून आली आहे. इतर ठिकाणी काळ्या सफरचंदाची शेती केल्याचं अजून तरी समोर आलं नाही. पण काळे सफरचंद खरेदी करण्याआधी याची किंमत ऐकून आश्चचर्यचकीत व्हाल. या एका सफरचंदाची किंमत 1 हजार ते 15 हजार रूपये इतकी आहे. ही किंमत फक्त एका सफरचंदाची असून एक-दोन किलो सफरचंदाची किंमत किती असेल याची कल्पना करा. हे एका विशिष्ट प्रकारचं सफरचंद असून याला 'हुआ नियू' असं म्हटलं जातं. या सफरचंदापासून अनेक गुणधर्म मिळतात. हे गुणधर्मच या सफरचंदाला अत्यंत मौल्यवान बनवतं.
या सफरचंदापासून मिळणारे फायदे
काळ्या सफरचंदामध्ये भरपूर पोषण तत्व उपलब्ध असतात. या फळामध्ये अँटिबॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर असतात. यापासून विटामिन- अ आणि अँटिऑक्सिडेंटही भरपूर मिळतात. या सफरचंदाच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. तसेच, तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहतो. तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी काळे सफरचंद अत्यंत फायदेशीर फळ आहे. पण या फळाची शेती थंड प्रदेशातच करता येते. उष्ण वातारणाच्या प्रदेशात काळ्या सफरचंदाची शेती करता येऊ शकत नाही. परंतु भूतान आणि लडाखमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून तिथं याची शेती केली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला सफरचंद तर खायला मिळेलच आणि याचा बिजनेस मॉडेलही उभं करता येऊ शकतं. बहुतांश लोकांना काळ्या सफरचंदाबद्दल माहिती नाही. त्यामुळे या फळांची मोठ्या प्रमाणात शेती करून लोकांना कमी किमतीत विक्री केली, तर तुमचा सफरचंदाचा बिझनेस भरपूर चालू शकतो. कारण हल्ली बऱ्यापैकी लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक होताना दिसून येतात.