Health Tips : बरेचदा लोक घाईगडबडीत उभे राहूनचं घटाघटा पाणी पितात. मात्र, हा अतिशय चुकीचा मार्ग आहे. त्याचा आपल्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो. एवढेच नाही, तर संपूर्ण जैविक प्रणालीवर त्याचा परिणाम होतो. पाणी नेहमी बसून आणि हळूहळू प्यावे. जर, तुम्ही उभे राहून पाणी पीत असला, तरी ते घोट-घोट प्या. एका घोटात पाणी प्यायचा प्रयत्न कराल, तर ते तुमच्या फुफ्फुसात पोहोचून त्यामुळे अॅस्पिरेशन न्यूमोनिया होऊ शकतो. यामुळे शरीर हायड्रेटही होत नाही.
आपल्या शरीरात 70-75% पाणी आहे आणि ते आपल्या जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. उभे राहून पाणी पिणे आरोग्याला हानी पोहोचवते. चला तर, याबद्दल अधिक जाणून घेऊया...
किडनीची समस्या
उभे राहून जलदगतीने पाणी प्यायल्याने तहान भागत नाही आणि काही मिनिटांनी पुन्हा पाणी प्यावेसे वाटते. याशिवाय ते किडनीलाही हानी पोहोचवू शकते. खरं तर, जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पोटावर दाब पडतो, त्यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी मूत्राशयात जमा होतात, ज्यामुळे नंतर किडनीला त्रास होतो.
फुफ्फुसाची समस्या
उभं राहून पाणी पिण्याने फुफ्फुसांनाही नुकसान होऊ शकते. कारण, यामुळे पाणी ते झपाट्याने आत जाते, अशा स्थितीत आपल्या शरीरातील फूड पाईप आणि विंड पाईपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. जर, एखाद्या व्यक्तीने ही सवय सुधारली नाही, तर नंतर त्याला फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो.
सांधेदुखीची समस्या
शरीराच्या जैविक प्रणालीला त्रास होऊ नये, यासाठीच फक्त बसून पाणी प्यायले पाहिजे असे नाही. जेव्हा एखादी व्यक्ती वेगाने आणि उभे राहून पाणी पिते, तेव्हा शरीराचे द्रव संतुलन बिघडते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि पोटाच्या इतर समस्याही वाढवतात. यामुळे सांध्यामध्ये द्रव साठण्यास सुरुवात होते, ज्यामुळे नंतर हाडांवर परिणाम होण्याव्यतिरिक्त सांधेदुखीची लक्षणेही दिसू शकतात.
पचनाची समस्या
उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी पोटात झपाट्याने पोहोचते, त्यामुळे त्याचा दाब पोटावर पडतो. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. जर, तुम्हाला पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही फक्त उभे राहूनच नाही, तर जेवताना देखील पाणी पिणे बंद केले पाहिजे. जेवण्याच्या किमान अर्धा तासाने पाणी प्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
- Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha