Cosishield Covid Vaccine :



Cosishield Covid Vaccine : कोविशिल्ड कोरोना लस घेतलेल्यांसाठी अतिशय चिंताजनक बातमी समोर आली आहे. कोविशिल्ड लसीचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, हे कंपनीने मान्य केलं आहे. अनेकदा असे आरोप करण्यात आले होते. पण आता कंपनीच्या कबुलीमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. कोविड लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या दावा धोक्याची घंटा आहे.


कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी चिंतेची बाब


कोविशिल्ड लस उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) एक मोठा खुलासा केला आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, कंपनीने पहिल्यांदाच कबूल केले आहे की, कोविड -19 लस कोविशिल्डमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. दरम्यान, अशा प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.


कोविशिल्ड लसीचा आरोग्यावर दुष्परिणाम 


ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीची कोरोना प्रतिबंधात्मक लस कोविशिल्ड (Covishield) आणि वॅक्सजवेरिया (Vaxjaveria) या नावाने जगभरात विकल्या गेल्या. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेका कोविड लस कोविशिल्ड (Covishield) आणि वॅक्सजवेरिया (Vaxjaveria) ही कोरोना लस विविध नावांनी जगभर विकली गेली. 


कोविशिल्ड लसीमुळे गंभीर आजाराचा धोका


कोविशिल्ड लसीमुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लसीमुळे मृत्यूंसह अनेक गंभीर आजारांबाबत ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या लसीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.


कुणी दाखल केला गुन्हा?


या लसी विरोधात अनेक लोकांनी न्यायालयात खटले दाखल केले होते. ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) लसीच्या दुष्परिणामांमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्याचा आरोप अनेकांनी केला होता. त्यामुळे आता कंपनीने या लसीच्या दुष्परिणामांची दिलेली कबुली खूप महत्वाची आहे, कारण यामुळे लसीकरणाचा संभाव्य धोका स्पष्ट होतो. याप्रकरणी जेमी स्कॉट यांनी खटला दाखल केला होता. त्याने एप्रिल 2021 मध्ये ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) लसीचा डोस घेतला, त्यानंतर त्यांच्या मेंदूवर कायमचा परिणाम झाla आहे.


लसीमुळे नेमके काय दुष्परिणाम होतात?


जेमी स्कॉटसह इतर रुग्णांच्या प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सोबत थ्रोम्बोसिस नावाचा एक दुर्मिळ दुष्परिणाम दिसून आला आहे. ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीने ब्रिटन (UK) उच्च न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की, या लसीमुळे TTS सारखे दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु याची शक्यता फारच कमी आहे.