मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. देशात दिवसागणिक एक लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद होत आहे. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षण जाणून घेणं आणि यापैकी कोणतीही लक्षणं आढळून आली तर तत्काळ वैद्यकीय सल्ल्यानं उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत 1.28 कोटींहून अधिक कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. तसेच देशात सध्या 8.87 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याव्यतिरिक्त 1.66 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दुसरीकडे 1.18 कोटींहून अधिक कोरोना रुग्णंवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आता देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेनही समोर आला आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अत्यंत घातक असल्याचं बोललं जात आहे. आता देशातील अनेक राज्यांत कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं जाणून घेऊया...
मुख्य लक्षणं :
- ताप
- कोरडा खोकला
- थकवा
इतर लक्षणं :
- खाज येणं आणि वेदना होणं
- घशात खवखव होणं
- जुलाब
- डोळे येणं
- डोकेदुखी
- चव आणि गंध ओळखणं कठिण होणं
- त्वचेचं इन्फेक्शन
- हात आणि पायाच्या बोटांचा रंग बदलणं
गंभीर लक्षणं :
- श्वास घेण्यास त्रास होणं
- धाप लागणं
- छातीत दुखणं
- बोलताना किंवा चालता-फिरताना त्रास होणं
राज्यात बुधवारी विक्रमी 59907 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, 30296 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज 59 हजार 907 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 30 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात 322 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 56 हजार 652 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36 टक्के झाले आहे. राज्यात काल 55 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :