Cancer: सध्या हिवाळा सुरू आहे, अशात गरमा-गरम, वाफाळलेला चहा किंवा कॉफी प्यायला जवळपास सगळ्यांनाच आवडते. तर काही लोक असे आहेत, जे खूप गरम चहा किंवा कॉफी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का? ही सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. रोज खूप गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने तोंडाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
Hot चहा किंवा कॉफीमुळे कर्करोगाचा धोका? तज्ज्ञ सांगतात...
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार तज्ज्ञ शिल्पी अग्रवाल यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय, त्या म्हणतात, अति गरम पेयांचे उच्च तापमान आपल्या शरीरातील पेशींचे विभाजन आणि त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
चहा-कॉफीचं तापमान किती असायला हवं?
शिल्पी अग्रवाल देखील म्हणतात की, 65 डिग्री सेल्सिअस किंवा 149 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमान असलेले गरम पेय सर्वात धोकादायक मानले जाते, ती म्हणते की पेयांचे तापमान मध्यम पातळीवर ठेवल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. गरम पेयांव्यतिरिक्त, धूम्रपान, मद्यपान आणि खराब दात यांमुळे तोंडाचा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
ग्रासनली कॅन्सर म्हणजे काय?
ग्रासनली कॅन्सर हा एक कर्करोग आहे जो अन्ननलिकेमध्ये होतो. हा कर्करोग अन्ननलिकेच्या आतील थरापासून सुरू होतो आणि जसजसा तो वाढत जातो तसतसा तो बाहेरील त्वचेच्या थरांमध्ये पसरतो. अन्ननलिका कर्करोगाचे दोन सर्वात सामान्य प्रकार आहेत-
एडेनोकार्सिनोमा- एडेनोकार्सिनोमा कर्करोग ग्रंथीच्या पेशींमध्ये तयार होतो. या पेशी अन्ननलिकेच्या कंट्रोलमध्ये असतात, ज्या कफ तयार करतात. सहसा ते अन्ननलिकेच्या खालच्या भागात, पोटाजवळ तयार होतात.
स्क्वॅमस सेल कार्सिनोमा - स्क्वॅमस सेल कार्सिनोमा कर्करोग अन्ननलिकेच्या आतील पातळ पेशींमध्ये तयार होतो. हा कर्करोग अनेकदा अन्ननलिकेच्या वरच्या आणि मधल्या भागात आढळतो.
अन्ननलिका कर्करोगाची लक्षणे
- अन्नासह श्वास गुदमरण्याची समस्या.
- जेवण करताना त्रास किंवा वेदना.
- अचानक वजन कमी होणे.
- छातीत दुखणे किंवा जळजळ होणे.
- खोकला किंवा कर्कश आवाज.
- छातीत अन्न अडकल्यासारखे वाटणे.
हा कर्करोग कसा टाळाल?
- दारू, धूम्रपान आणि तंबाखूचा वापर सोडून द्या.
- तुमच्या आहारात फायबरचा समावेश करा फायबर गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स नियंत्रित करते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
- कोमट चहा प्या - चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी,
- अँटीमाइक्रोबियल आणि इम्युनो स्टीमुलेंट अन्ननलिकेच्या कर्करोगात फायदेशीर ठरू शकतात.
- कोमट कॉफी प्या - कॉफीमध्ये असलेले कॅफिन सायक्लिन-किनेज-4-पेशींची वाढ रोखते.
हेही वाचा>>>
Weight Loss: कोणत्याही मेहनतीशिवाय...अगदी सहज...महिलेनं तब्बल 19 किलो वजन कमी केलं? सीक्रेट केले शेअर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )