Treatment of Shortness of Breath : सधाच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करतात. दुसरीकडे, कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे. वर्क फ्रॉम होम, व्यायामाचा अभाव यामुळे अनेक लोकांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. सकस आहाराची कमतरता आणि दीर्घकाळ घरात राहिल्यामुळे लोक अशक्तही होऊ लागले आहेत. 


पायर्‍या चढताना तुम्हाला दम लागतो का?


अनेकांना काही पाऊल चालल्यावर किंवा एखादं लहान काम करताना दम लागतो. काही जण शरीराची थोडी जास्त हालचाल झाल्यावर अस्वस्थ होतात आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करु नका. हे, धोकादायक आजाराचे गंभीर लक्षण असू शकते. मानवाला जगण्यासाठी श्वासोच्छवास ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरात एखादा धोकादायक आजार येतो तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला त्रास होऊ लागतो. 


'या' 5 पैकी एका गंभीर आजाराचा धोका


हेल्थ डायरेक्ट (HealthDirect) नुसार, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, फुफ्फुसात किंवा हृदयामध्ये संसर्ग, पॅनीक अटॅक आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीत अडथळा यांमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि तुम्ही पायऱ्या चढून किंवा वेगाने चालता तेव्हा श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या पाच गंभीर आजारांचा धोका असल्याने यावर वेळीच उपाय करा.


याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका


अनेक लोक जिने चढण्याऐवजी लिफ्ट वापरण्यास प्राधान्य देतात, कारण दोन-चार पायऱ्या चढताच त्यांचा श्वास फुलायला लागतो. काही पाऊल चालल्यावर त्यांना दम लागतो आणि त्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढतात. पायऱ्या चढताना धाप लागणे ही सामान्य गोष्ट आहे, पण जर एखाद्या व्यक्तीला असे जास्त वेळ होत असेल तर याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. यावर घरगुती उपाय जाणून घ्या.


छातीत दुखत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या


श्वासोच्छवास करण्यास त्रास होत असेल किंवा खोकला, छातीत दुखणे, छातीत गच्च वाटणे, वारंवार शिंका येणे, नाक बंद होणे आणि घसा खवखवणे यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


बदलत्या ऋतूत काळजी घ्या


सध्या हवामान खूप वेगाने बदलत आहे. बदलत्या हवामानात श्वसनाचे आजार खूप धोकादायक ठरतात. अशा वेळी व्हायरस आणि बॅक्टेरियाचा धोका वाढतो. ज्यामुळे तुमच्या विंडपाइपमध्ये सूज येऊ लागते. त्यामुळे बदलत्या वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घ्या.


धूम्रपान करू नका किंवा जंक फूड खाऊ नका


धूम्रपान, मद्यपान, जास्त जंक फूड खाल्ल्याने श्वासोच्छवासासंबंधित आजारांचा त्रास वाढू शकतो. अशा वेळी बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. यामुळे हा गंभीर आजार होऊ शकतो.


फुफ्फुसांना डिटॉक्स करा, सकस आहार घ्या


बदलत्या वातावरणात फुफ्फुसांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी तसेच डिटॉक्सिंग करा. यासाठी अँटिऑक्सिडंट्स युक्त योग्य आहार घेणं आवश्यक आहे. यामुळे हळद, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, भोपळा, सफरचंद, बीटरूट यांचा आहारात समावेश करा.


आलं ठरेल रामबाण उपाय


जर तुम्हाला श्वासोच्छावासासंबंधित त्रास जाणवत असेल तर आलं हा रामबाण उपाय ठरेल. यामुळे फुफ्फुसांमधील संसर्ग कमी करण्यात मदत होईल. यासाठी आले, लिंबू आणि मधाचा बनवलेला हर्बल चहा रोज प्या. हा चहा फुफ्फुसातील नसांना आराम देण्यासोबतच डिटॉक्स होण्यास मदत करतो.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :

Eye Flu : डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली! संसर्ग टाळण्यासाठी करा 'हे' 5 घरगुती उपाय